Indian Army In Ladakh : (India China) भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये सीमावादावरून उडणारे खटके नवे नाहीत. देशातील काही भागांवर आपल्या देशाचा दावा सांगणाऱ्या चीननं तर, तिथे भारतातील काही गावांचा चीनी भाषेत उल्लेखही केला तर, इथून भारतीय लष्करानं आतापर्यंत सीमाभागात वेळोवेळी चीनच्या सर्व कुरापती परतवून लावल्या. आता तर, भारतीय लष्कराच्या (indian army) एका कृतीमुळं चीनच्या सैन्यालाच नव्हे तर चीनच्या प्रशासनालाही खडबडून जाग आली असेल. कारणही तसंच आहे.
पूर्व लडाखमध्ये (Ladakh) 14 हजार फूटांवर युद्धसराव करून भारतीय सैन्याने चीनला आपल्या क्षमतेची जाणीव करून दिली आहे. समुद्रसपाटीपासून 14 हजार फूट उंचीवरील हा युद्धाभ्यास भारतीय सैन्याच्या क्षमतेचे प्रदर्शन घडविणारा ठरलाय. या युद्ध सरावात अत्याधुनिक रणगाड्यांचा वापर करण्यात आला आहे.
लष्करानं हा युद्धसराव करत लडाखच्या भागामध्ये चीनला आपल्या ताकदीची जाणीव करून दिली. चीन आणि भारत या दोन्ही देशांच्या सीमाभागात येणाऱ्या लडाखमध्ये गेल्या काही वर्षांपासून चीनच्या सैन्याकडूनही घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. पण, वेळोवेळी भारतीय लष्करानं हा डाव उधळून लावला. युद्धसरावादरम्यानही लष्कराच्या रणगाड्यांनी नद्यांमधून उतरून शत्रू कुठुनही आला तरी त्याच्यावर हल्ला करत त्याला माघारी धाडायचं हा संदेशच जणू दिला.
रणगाड्यांच्या माध्यमातून युद्धसराव करताना भारतीय लष्कराकडून जवानांना शत्रूशी दोन हात करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, पूर्व लडाखचा भाग बाल्टिस्तान, गिलगिट बाल्टिस्तान, अक्साय चीन या भागांशी जोडलेला आहे. त्यामुळं या भूभागावरून चीनसाठी हा अतिशय महत्त्वाचा आणि थेट इशारा समजला जात आहे. चीनच्या या भागातून होणाऱ्या कुरापती म्हणता त्यांचा कावेबाजपणा इथं साध्य होऊ दिला जाणार नाही हेच या युद्धसरावातून दाखवून देण्यात आलं.
पूर्वी लद्दाख में सेना का युद्धाभ्यास, नदी को पार कर टैंक ने टारगेट को उड़ाया #China #IndianArmy #Ladakh | @Nidhijourno @anchorjiya pic.twitter.com/gid3pvIyyc
— Zee News (@ZeeNews) July 8, 2023
जम्मू आणि काश्मीर (Jammu Kashmir) भागामध्ये अनेक तरुणांना दहशतवाद पसवण्यासाठी प्रवृत्त केलं जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. दहशतवाद पसरवण्याच्या या प्रयत्नांना आवर घालण्यासाठी आता सुरक्षा दलाने कंबर कसली असून, जवळपास 250 दहशतवाद्यांची यादी जारी केलीय. या यादीतील सर्वांची संपत्ती आता जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.