भारतात 153 विमानतळ त्यापैकी 118 देशांतर्गत अन् 35 आंतरराष्ट्रीय विमानतळ; सर्वात लहान विमानतळ माहितीये का? इथे उतरतं फक्त एक विमान

India Smallest Airport : आज भारतात दररोज मोठ्या संख्येने लोक विमान प्रवास करतात, मात्र तुम्हाला भारतातील सर्वात लहान विमानतळ माहितीये का? जिथे फक्त एकच विमान उतरतं. 

नेहा चौधरी | Updated: Dec 27, 2024, 09:47 PM IST
भारतात 153 विमानतळ त्यापैकी 118 देशांतर्गत अन् 35 आंतरराष्ट्रीय विमानतळ; सर्वात लहान विमानतळ माहितीये का? इथे उतरतं फक्त एक विमान  title=

India Smallest Airport : भारतातील एकूण विमानतळांची संख्या 153 असून त्यापैकी 118 देशांतर्गत आणि 35 आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी विमानतळ आहेत. देशातील सर्वात मोठ्या विमानतळांबद्दल बोलायचं झालं तर, हैदराबादचं राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्लीचं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबईचं छत्रपती शिवाजी विमानतळ हे देशातील सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एक आहेत. पण तुम्हाला भारतातील सर्वात लहान विमानतळ माहितीये का? जिथे एका वेळी एकच विमान उतरु शकतं. हा प्रवास खर्चिक असला तरी कमी वेळाचा आणि आरामदायी असा हा प्रवास आज दररोज असंख्य लोक करतात. 

देशातील सर्वात लहान विमानतळ कोठे आहे? 

भारतात अनेक विमानतळ आहेत, ज्यामध्ये सर्वात लहान विमानतळाचं नाव बलजेक विमानतळ आहे, ज्याला तुरा विमानतळ असंही म्हणतात. हे विमानतळ मेघालय राज्यात ईशान्येकडे 33 किलोमीटर अंतरावर आहे. हा विमानतळ 20 आसनी विमान डॉर्नियर 228 साठी बांधण्यात आला होता. मात्र, जमीन संपादित करून ती वाढवण्याची योजना होती, त्यासाठीची अंतिम मुदत गेल्या वर्षीच संपली पण अद्याप त्याच काम झालं नाही. 

 

हेसुद्धा वाचा - PHOTO : खालून जहाजं अन् पाण्याच्या वरून धावणार ट्रेन; भारतातील पहिला सी लिफ्ट ब्रिजमुळे 1 तासाचा प्रवास येणार 20 मिनिटांवर

 

फक्त एक किलोमीटरची धावपट्टी 

भारतातील सर्व विमानतळांवर अनेक किलोमीटरच्या धावपट्टी आहेत, मात्र या विमानतळावर धावपट्टी केवळ एक किलोमीटरचीच करण्यात आली आहे. म्हणजे त्यावर लहान जहाजच उतरवता येते. या कारणास्तव असेही म्हणता येईल की हे भारतातील सर्वात लहान विमानतळ आहे. याबाबतचा प्रस्ताव 1983 मध्ये केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता, त्याला 1995 मध्ये मंजुरी देण्यात आली होती. तो 12 कोटी 52 लाख रुपयांना तयार करण्यात आला होता. हा विमानतळ 2008 मध्ये बांधण्यात आला होता.