Viral Video King Cobra In Helmet : सोशल मीडियावर क्षणा क्षणाला अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मनोरंजक तर काही धक्कादायक असतात. काही व्हिडीओ माहितीपूर्ण आणि संशोधनावर आधारित असतात. या असंख्य व्हिडीओमधून काहीच व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात. सध्या सोशल मीडियावर एका बाईकस्वाराचा व्हिडीओ सोशल व्हायरल होतोय. खरं तर व्हिडीओ अतिशय धक्कादायक आहे. एक व्यक्ती धावत्या बाइकवर हेल्मेट घालून जात असताना अचानक बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या कडेला थांबला. आजूबाजूला असलेल्या लोकांना नेमकं काय घडलं समजलं नाही. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, एक माणूस हेल्मेट घालण्याचा प्रयत्न करतो आणि अचानक किंग कोब्राच्या पिल्लाने त्याच्यावर हल्ला केला. अन् त्याचा डोक्याला दंश केला. दैनंदिन गोष्टींमध्येही अनपेक्षित धोके कसे असू शकतात हे ही घटना दर्शवणारा व्हिडीओ आहे. ही घटना केवळ हेल्मेट परिधान केलेल्या व्यक्तीसाठी धोकादायक नव्हती, मात्र हे देखील दर्शवते की आपण आपल्या सुरक्षेबाबत निष्काळजी राहतो. हा धक्कादायक व्हिडीओ दक्षिण भारतातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, त्या व्यक्तीला इतर लोक हॉस्पिटला घेऊन जाताना दिसतायेत. तर हेल्मेटमध्ये तो छोटा किंग क्रोबादेखील या व्हिडीओमध्ये दिसतोय.
अशी घडना ही पहिलीच वेळ नाही. गावाकडील शेताजवळ किंवा जंगलाजवळील घरांमध्ये अशा घटना घडतात. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात केरळमध्येही एक घटना घडली होती. त्यावेळी एका व्यक्तीने हेल्मेट आपल्या कामाच्या ठिकाणाजवळ ठेवले होते. जेव्हा त्याने हेल्मेट उचलले तेव्हा त्याला आत काहीतरी विचित्र हलत असल्याचे जाणवले. त्या व्यक्तीने तातडीने वनविभागाशी संपर्क साधला आणि एक स्वयंसेवक घटनास्थळी पोहोचला. त्यांनी हेल्मेट उघडले असता त्यात दोन महिन्यांचे कोब्रा त्यात आढळला होता. महत्त्वाचे म्हणजे हा साप लहान असला तरी त्याचं विष अतिशय घातक असतं.
यह दक्षिण भारत का वीडियो है एक कोबरा का बच्चा हेलमेट में छुपा हुआ था और व्यक्ति के सर में काट लिया !!
जब भी आप हेलमेट पहने तो एक बार हेलमेट को ठोक कर झाड़ कर ही पहने !!#ViralVideos #Helmet #Viral pic.twitter.com/8PnRKdMXjo— MANOJ SHARMA LUCKNOW UP (@ManojSh28986262) December 24, 2024
ही घटना लोकांना जागरूक करण्याची मोठी संधी मानली जातंय. तज्ज्ञांचं म्हणणंय की, अशा घटनांवरून हे सिद्ध होते की, आपल्याला आपल्या सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. लहान आणि धोकादायक सापांच्या उपस्थितीमुळे, आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, विशेषतः जेव्हा आपण हेल्मेट किंवा बॅग इत्यादी दैनंदिन गोष्टी वापरतो. ते नीट तपासणे महत्त्वाचे आहे.