Himachal Pradesh Exit Poll 2022: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर आता कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. निवडणूक निकालापूर्वी आता एक्झिट पोलनुसार हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचे सरकार बनत असल्याचं दिसतंय. एक्झिट पोलचे निकाल बदलणार की नाही, याचं उत्तर येत्या 8 डिसेंबरला मतमोजणीनंतर कळणार आहे.
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 12 नोव्हेंबरला मतदान झालं. हिमाचल प्रदेशमधील 68 विधानसभा जागांवर 76 टक्के मतदान झालं होतं. त्यामुळे यंदा कौल कोणाच्या दिशेने जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच आता झी न्यूजच्या एक्झिट पोलनुसार हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचं कमळ फुलणार असल्याचं दिसतंय.
कोणाला किती टक्के मते मिळतील ?
भाजप - ४७
काँग्रेस - ४१
आप - २
इतर - १०
...........................
कोणाला किती जागा मिळतील ?
भाजप - ३५ ते ४०
काँग्रेस - २० ते २५
आप - ० ते ३
इतर - १ ते ५
.............................
2017
मतदान टक्केवारी
भाजप - ४८.८
काँग्रेस - ४१.७
इतर - १०
जागा
भाजप - ४४
काँग्रेस - २१
इतर - ३
दरम्यान, हिमाचल (Himachal Pradesh) हे असं राज्य आहे की, जिथं 42 वर्षांपासून लोकांनी फक्त दोनच पक्षांवर विश्वास व्यक्त केला आहे, ते म्हणजे भाजप आणि काँग्रेस... मात्र यावेळी आम आदमी पक्षानेही (AAP) चुरशीने निवडणूक लढवली. आता दिल्लीप्रमाणे येथेही ती जनतेचा विश्वास जिंकणार की भाजप (BJP) आणि काँग्रेसपैकी (Cogress) एकाला कमान मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.