PM Modi Shawl Price: गुजरातमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज 5 डिसेंबर रोजी सुरु झालं आहे. त्यासाठी एक दिवस आधी म्हणजेच 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी अहमदाबादला पोहोचले होते. अहमदाबाद विमानतळावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) हे थेट त्यांची आई हीराबेन मोदी यांना भेटण्यासाठी त्यांच्या गांधीनगर येथील निवासस्थानी गेले. त्या दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी एक शाल ओढली होती. त्या शालनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी ओढलेल्या या शालची चांगलीच मोदींनी एक पिवळ्या रंगाची शाल घेतली होती. सध्या या शालची चांगलीच चर्चा सुरु आहे. खरंतर या शालची चर्चा ही तिच्या नक्षी कामामुळे नाही तर तिच्या किंमतीमुळे आहे. Pure Kashmir नावाच्या एका वेब साईटवर असलेल्या माहितीनुसार या शालची किंमत 1650 डॉलर म्हणजेच तब्बल 1 लाख 34 हजार रुपये इतकी असल्याचं म्हटलं जात आहे. तर Pashmina Shawl या ब्रॅंडची ही शॉल असल्याचे म्हटले जात आहे. तर त्यांच्या प्रमाणे या शालची किंमत ही 1 लाख 70 हजार रुपये आहे. (pashmina shawl)
हेही वाचा : ...आणि चक्क पत्नी Kareena Kapoor ला विसरला Saif Ali Khan?
गुजरात विधानसभा मतदानसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील रानीप येथील निशान पब्लिक स्कूलमध्ये मतदान दिले. गुजरातमध्ये सकाळी 8 वाजता मतदान सुरु झालं होतं. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांनी ट्वीट करत म्हटले होते की, 'गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान करणाऱ्या सर्वांना, विशेषत: तरुण मतदार आणि महिला मतदारांना मी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करतो.' स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गुजरात विधानसभा मतदानासाठी मतदान केलं आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.