धक्कादायक! पतीच्या मैत्रिणीला धडा शिकवण्यासाठी पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल, अंगाचा थरकाप उडवणारी घटना

पतीचे त्याच्या मैत्रिणीबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचा तिला संशय होता, यासाठी तिने केलं असं काही...   

Updated: May 31, 2022, 05:33 PM IST
धक्कादायक! पतीच्या मैत्रिणीला धडा शिकवण्यासाठी पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल, अंगाचा थरकाप उडवणारी घटना title=
प्रतिकात्मक फोटो

हैदराबाद : पतीच्या मैत्रिणीला धडा शिकवण्यासाठी एका महिलेने इतकं भयानक पाऊल उचललं की पोलीसही चक्रावले. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील गचिबोवली इथली आहे. पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन एका महिलेने आपल्या पतीच्या मैत्रिणीवर गुंडांकडून सामूहिक बलात्कार करायला लावला. धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार गुंडांना मोबाईलमध्ये रेकॉर्डही करायला सांगितला.

पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपी महिलेसह पाच गुंडांना अटक केली. सर्व आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिलेचा पती श्रीकांत युपीएससी परीक्षेची तयारी करत होता. याचदरम्यान एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये महिलेचा पती आणि पीडीत महिलेची भेट झाली. पीडित महिलाही युपीएससी परीक्षेची तयारी करत होती. त्यामुळे दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. पीडित महिला अनेक वेळा श्रीकांतच्या घरीसुद्धा येत होती. 

महिलेला पती श्रीकांतवर संशय
ऑक्टोबर 2021 ते फेब्रुवारी 2022  या काळात पीडित महिला श्रीकांत यांच्या घरी वास्तव्याला होती. यादरम्यान पतीचे त्या महिलेशी संबंध असल्याचा पत्नीला संशय आला. यावरुन श्रीकांत आणि त्याच्या पत्नीची वारंवार भांडणं होऊ लागली. भांडणामुळे पीडित महिलेने श्रीकांतचं घर सोडलं आणि ती दुसरीकडे राहायला गेली. मात्र श्रीकांतसोबत तिचे संबंध कायम होते. 

वाद सोडवण्यासाठी पीडित महिलेला बोलावलं
26 मे रोजी आरोपी महिलेने वाद सोडवण्यासाठी पीडितेला तिच्या घरी बोलावले. पीडित महिला घाबरली होती, त्यामुळे ती तिच्या नातेवाईकांसोबत आली, मात्र आरोपी महिलेने तिच्यासोबत आलेल्या नातेवाईकांना बाहेरच राहण्यास सांगितलं. तिच्याबरोबर एकांतात बोलायचं आहे असं सांगून आरोपी महिलेने पीडितेला घरात नेलं. 

आरोपी महिलेने आधीच भाडोत्री गुंडांना घरात बोलवून ठेवलं होतं. त्यामुळे पीडित महिलेने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण आरोपी महिला आणि पाच गुंडांनी मिळून तिला पकडलं. ती ओरडून नये यासाठी तिच्या तोंडात कापडाचा गोळा कोंबण्यात आला. आधी तिला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर चार आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला.

बलात्कार केल्यानंतर पाचही गुंड घराबाहेर पळून गेले, त्यामुळे पीडितेच्या नातेवाईकांना संशय आला त्यांनी तात्काळ घरात धाव घेतली त्यावेळी पीडित महिलेला पाहून नातेवाईक हादरले. त्यांना तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. 

पोलिसांनी आरोपी महिला आणि पाच गुंडांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.