'घे, अजून किती खाणार...' सरकारी कार्यालयात भ्रष्ट अधिकाऱ्यावर नोटांचा वर्षाव, VIDEO व्हायरल!

Gujarat Viral Video: गुजरातमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 13, 2025, 02:08 PM IST
'घे, अजून किती खाणार...' सरकारी कार्यालयात भ्रष्ट अधिकाऱ्यावर नोटांचा वर्षाव, VIDEO व्हायरल! title=
भ्रष्ट अधिकाऱ्यावर नोटांचा वर्षाव

Gujarat Viral Video: सरकारी काम आणि 10 महिने थांब अशी आपल्याकडे म्हण आहे. कारण सरकारी कार्यालयात गेल्यावर कोणतेच काम लाच दिल्याशिवाय होत नाही, असा नागरिकांचा अनुभव असतो. त्यामुळे नागरिक वेळोवेळी संताप व्यक्त करतात. पण सर्वसामान्य नागरिकांना जेव्हा संताप अनावर होतो, तेव्हा काय होऊ शकतं, याची प्रचिती गुजरातमध्ये आली आहे. काय घडलाय प्रकार? जाणून घेऊया. 

गुजरातमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक एका सरकारी कार्यालयात उपस्थित दिसतायत. काही नागरिक गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन करताना दिसतायत. त्यांनी गळ्यात फलक लटकवलाय आणि भ्रष्ट अधिकाऱ्याविरोधात घोषणा देत आहेत. 

एक अधिकारी हात जोडून खुर्चीवर बसलेलाही या व्हिडीओमध्ये दिसतोय. गुजराती नागरिक आपल्या भाषेत त्याच्यावर आरोप करत आहेत. यासोबतच लोकांनी नोटांचे गठ्ठेही सोबत आणले आहेत. लोक या नोटा अधिकाऱ्यावर फेकताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. संतप्त लोक अधिकाऱ्यावर कसा राग काढत आहेत, हे आपल्याला या व्हिडीओतून पाहायला मिळते. 

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ

'कलाम की चोट' नावाच्या एका युजरने त्याच्या एक्स अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना 'घे! बेकायदेशीरपणे कमावलेले पैसे किती खाणार?' असे कॅप्शन लिहिले आहे. अधिकारीपण काय करणार? नोकरी मिळवण्यासाठी त्याने किती लाच दिली असेल? आता तो त्याच्या बॉसला काय देत असेल का? याचा अंदाज घेणे देखील महत्त्वाचे असल्याचे लोकं म्हणत आहेत.  हा व्हायरल व्हिडिओ गुजरातमधील असल्याचे सांगितले जात आहे.

लोकांनी त्या अधिकाऱ्याला चांगलाच धडा दिला. माझ्या सोसायटीत घाणेरडे पाणी येत आहे, असे एकजण सांगतोय. तर बिस्मिल्ला सोसायटीमध्येही असेच असल्याचे दुसरा नागरिक सांगतोय. किती पैसे खाणार? घे आणि खा, असे त्याला लोकं सांगतायत. नागरिक एवढ्यावरच थांबत नाहीत. पुढे जाऊन लोक लिफाफ्यातून पैसे काढतात आणि त्याच्यावर पैशांचा वर्षाव करतात. काहीजणांनी ही संपूर्ण घटना कॅमेरामध्ये कैद केली आहे. हे सर्व घडत असताना तो अधिकारी हात जोडून त्याच्या जागेवर बसून राहिल्याचे दिसतंय. हा व्हिडिओ गुजरातच्या कोणत्या भागातील आहे हे अद्याप कळलेले नाही. पण भ्रष्ट अधिकाऱ्यांना चांगला धडा मिळाल्याची प्रतिक्रिया या व्हिडीओखाली वाचायला मिळत आहे.