लग्नसराईच्या दिवसांत सलग दुसऱ्या दिवशी सोनं वधारलं; जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे भाव

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत सोन्या-चांदीचे दर 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 19, 2024, 11:41 AM IST
लग्नसराईच्या दिवसांत सलग दुसऱ्या दिवशी सोनं वधारलं; जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे भाव title=
Gold price today on 19th november in india gold silver rates surge due to wedding season

Gold Price Today: लग्नसराईचे दिवस सुरू होताच सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. मात्र आता सोनं पुन्हा वधारलं आहे. सराफा बाजारात मौल्यवान धातुच्या मागणीत वाढ झाल्याने किंमत वाढली आहे. वायदे बाजारातही तेजी दिसून येत आहे. मात्र यामागे डॉलरचे मूल्य हे देखील कारण आहे. 

डॉलर इंडेक्सची तेजी थांबल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 40 डॉलरने उसळून 2615 डॉलरवर पोहोचला आहे. तर, चांदी अडीच टक्क्यांनी मसबूत झाली आहे. आज  सोनं 760  रुपयांनी वाढून 77,070 रुपयांवर पोहोचले आहे. दोनच दिवसांत सोन्याचे दर हजार रुपयांनी वाढले आहेत. MCX वर सोन्याचा भाव 75 हजारांच्या वर ट्रेड होत आहे. सोनं-चांदीची चमक वाढली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मागील आठवड्या सोनं घसरल्यानंतर आज सोन्याला झळाळी मिळाली आहे. 

आज 22 कॅरेट सोनं 700 रुपयांनी वधारलं आहे त्यामुळं आज 70,650 रुपयांवर पोहोचलं आहे. तर 18 कॅरेट सोनं 580 रुपयांनी वाढून 57,810 रुपयांवर पोहोचले आहे. 24 कॅरेट सोनं 760 रुपयांनी वाढून 77,070 रुपयांवर पोहोचले आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  70, 650 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  77,070 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  57,810 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,065 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 707 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 781 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   61,656 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   61,656 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    57,810 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 70, 650 रुपये
24 कॅरेट- 77,070 रुपये
18 कॅरेट- 57,810 रुपये