पत्रकारितेचा धर्म पाळण्यासाठी किंमत मोजायला झी मीडिया टीम तयार, माजी राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी मांडली भूमिका

देशासाठी माध्यमांचं स्वातंत्र्य महत्त्वाचं असल्याचं सांगत माजी राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी पत्रकारितेचा धर्म पाळण्यासाठी किंमत मोजायला झी मीडिया टीम तयार असल्याची भूमिका मांडली

Updated: Jun 3, 2024, 04:50 PM IST
पत्रकारितेचा धर्म पाळण्यासाठी किंमत मोजायला झी मीडिया टीम तयार, माजी राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी मांडली भूमिका title=

देशाची आर्थिक, सामाजिक रचना आणि वंचित घटकांच्या संरक्षणासाठी माध्यम स्वातंत्र्य असणं गरजेचं आहे, असं मत माजी राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा (Dr. Subhash Chandra) यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केलं.. पत्रकारितेचा धर्म पाळण्यासाठी पडेल ती किंमत मोजण्याची झी मीडियाची तयारी आहे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.