वहिनीनेचं केलं नणंदेचं आयुष्य उद्ध्वस्त, पीडितेच्या होणाऱ्या नवऱ्याला बोलवलं अन्...

Crime News In Marathi: उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना घडली आहे. एका मुलीवर पाशवी अत्याचार करुन व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 24, 2024, 12:35 PM IST
वहिनीनेचं केलं नणंदेचं आयुष्य उद्ध्वस्त, पीडितेच्या होणाऱ्या नवऱ्याला बोलवलं अन्...  title=
fiance rape on minor girl victim sister in law gives information

Crime News In Marathi: उत्तर प्रदेशच्या कौशांबीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार करण्यात आला आहे. पीडितीने आरोप केला आहे की, तिच्या वहिनीने तिला एका खोलीत बंद करुन एका व्यक्तीला आत पाठवले. प्रेमपाल नावाच्या व्यक्तीने तिच्यावर बळजबरी केली. इतकंच नव्हे तर क्रुरतेच्या सर्व सीमा पार केल्या. धक्कादायक म्हणजे, पीडित तरुणीच्या वहिनीनेच तिच्यावर हा अत्याचार केला आहे. तसंच, या घटनेचं संपूर्ण चित्रीकरण व्हिडिओत कैद केले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीच्या वहिनीमुळेच हा प्रसंग ओढावला आहे. तरुणीच्या वहिनीने आधी तिला खोलीत बंद करुन ठेवले नंतर प्रेमपाल नावाच्या व्यक्तीला आत पाठवले. आरोपीला पाहून तरुणी घाबरून गेली होती. त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी ती आरडाओरड करत होती. मात्र, बाहेर उभ्या असलेल्या तिच्या वहिनीला काहीच फरक पडला नाही. आरोपी प्रेमपालने तरुणीवर बलात्कार केला. इतकंच नव्हे तर तिच्या वहिनीने या घटनेचे चित्रीकरणदेखील केले. 

पीडित तरुणी जेव्हा शुद्धीत आली केव्हा तिने तिच्या प्रियकराला बोलवून संपूर्ण घटनाक्रम कथन केला. त्याचदरम्यान तरुणीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळं एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ एक पथक तयार करुन पीडितेच्या घरी पाठवलं होतं. जेव्हा पोलिस पीडितेच्या घरी गेले तेव्हा ती घरी सापडली नाही. पोलिसांनी तिच्या वहिनीला ताब्यात घेतलं आहे. 

आरोपीचा शोध सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला चौकशीत समोर आलं आहे की, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा आरोपीचे पीडित तरुणीसोबत लग्न ठरले होते. पोलिसांकडून आरोपी प्रेमपालचा शोध घेत आहेत. तर, एकीकडे पीडितेच्या प्रियकराचाही शोध घेतला जात आहे. या प्रकरणात अद्याप फक्त पीडितेच्या वहिनीला अटक करण्यात आली आहे. तर, अद्याप नेमकं काय घडलं याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. मात्र, पीडिताही गायब असल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला आहे. पोलिस सर्वबाजुनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी व्हायरल होणारा अश्लील व्हिडिओदेखील डिलीट केला आहे.