देशातल्या 23.59 कोटी नोकरदारांसाठी गुडन्यूज, PF बँक खाते चेक करा

नोकरदारांसाठी केंद्र सरकारने मोठी गुडन्यूज. देशातल्या 23.59 कोटी नोकरदारांसाठी वर्षाच्या अखेरीस सरकारने चांगली बातमी दिली आहे.  

Updated: Dec 22, 2021, 09:47 AM IST
देशातल्या 23.59 कोटी नोकरदारांसाठी गुडन्यूज, PF बँक खाते चेक करा title=
संग्रहित छाया

मुंबई : नोकरदारांसाठी केंद्र सरकारने मोठी गुडन्यूज. EPFO ने व्याजाचा हप्ता योगदानकर्त्यांच्या खात्यात हस्तांतरित केला आहे. देशातल्या 23.59 कोटी नोकरदारांसाठी वर्षाच्या अखेरीस सरकारने चांगली बातमी दिली आहे. EPFO व्याजाच्या हप्त्याशी संबंधित हे पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहेत. (EPFO Good News as Center Government has put money in the accounts of 23.59 crore employed people)

PF संबंधित 8.50 टक्के दराने व्याजाचे पैसे सरकारकडून क्रेडीट करण्यात आले आहेत. याचा लाभ देशातल्या 23.59 कोटी नोकरदारांना झाला आहे. EPFO खात्यात सरकार पैसे कधी ट्रान्सफर करणार याची उत्सुकता होती. EPFO व्याजाच्या हप्त्याशी संबंधित ही रक्कम आहे. 2020- 21 या आर्थिक वर्षात 8.50 टक्के दराने लोकाच्या खात्यात पीएफ व्याजाचे पैसे ट्रान्सफर करण्यात आलेत. EPFO ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. 

सरकारने नोकरदारांच्या EPFO खात्यात व्याजाचे पैसे पाठवले आहे. EPFO ने व्याजाच्या हप्त्याशी संबंधित पैसे योगदानकर्त्यांच्या खात्यात हस्तांतरित केले आहेत. EPFO ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केले आहे की, 2020-21 या आर्थिक वर्षात 8.50 टक्के दराने 23.59 कोटी लोकांच्या खात्यांमध्ये PF व्याजाचे पैसे जारी करण्यात आले आहेत. देशातील 23.59 नोकरदारांच्या खात्यात हे पैसे जमा झालेत. 

जर तुमचा EPF देखील कापला गेला असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यात जमा झालेल्या पैशांची माहिती काही सेकंदात मिळू शकते. यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या वेबसाइटवर जाण्याचीही गरज भासणार नाही. तुमच्याकडे फक्त तुमचा UAN असणे आवश्यक आहे आणि तुमचा मोबाईल नंबर EPF खात्याशी जोडलेला असावा. फक्त एसएमएस किंवा कॉल करा आणि तुमच्या EPF खात्याचा तपशील तुमच्या फोनच्या मेसेज बॉक्समध्ये येईल.