Dirty PaniPuri Video: रस्त्याच्याकडेला ठेल्यावर मिळणारी, कधी चटपटीत, कधी तिखट अशी पाणीपुरी सर्वांच स्ट्रीट फूड लव्हर्सचा आवडीचा पदार्थ आहे. विशेषत: मुलींमध्ये पाणीपुरी खाण्याचे प्रमाण जास्त असते. तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत कोणी ना कोणी पाणीपुरी आवडीने खाणारा एक ना एक तरी मित्र मैत्रिण असेलच. तुमच्या या मैत्रिणींना हा व्हिडीओ अजिबात दाखवू नका. कारण त्यांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसू शकतो.
पाणीपुरी स्ट्रीट फूड लव्हर्ससाठी इमोशन्स आहेत.सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. जो पाहून तुम्हाला संताप अनावर होऊ शकतो. पाणीपुरीची चव खूप छान असते. पण आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओपाहून पाणीपुरी लव्हर्सची इच्छा कायमची मरु शकते.
पहिल्या व्हिडीओमध्ये ठेल्यावर विकल्या जाणाऱ्या पाणीपुरीच्या पाण्यात खूप सारे किडे तरंगताना दिसत आहेत. सर्वसाधारणपणे पाणी घाणीमुळे खूप खराब झाले असेल तेव्हा असे किडे तरंगू लागतात. फक्त पाणीपुरीतून दिल्या जाणाऱ्या आंबट-गोड पाण्यातच नव्हे तर इतर पाण्यातदेखील किडे दिसले आहेत. या व्हिडीओमध्ये एक महिलादेखील दिसतेय. जी दुकानदारासोबत पाणीपुरीवरुन भांडण करताना दिसतेय.
दुसऱ्या व्हिडीओमध्येदेखील अशीच घाण दिसत आहे. जिथे पाण्यात किडे आणि त्यावर खूप साऱ्या घाणसदृश्य पदार्थ जमलेले दिसत आहे. हा एक शॉकिंग व्हिडीओ आहे. कशाप्रकारे काही पाणीपुरी विकणारे दुसऱ्यांच्या तब्येतीशी खेळ करत आहेत, हे तुम्हाला हे व्हिडीओ पाहून लक्षात आले असेल. खराब पाणी प्यायल्याने टायफॉइड, डायरिया, काविळ आणि फूड पॉयझनिंगसारखे गंभीर आजार होऊ शकतात.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय. यावर युजर्सकडून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. प्रशासनाने अशा प्रकारच्या दुकानदारांविरोधात कडक कारवाई करायला हवी, अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरु लागली आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिलंय, या पाणीपुरीवाल्याने थेट गटारातूनच पाणी घेतल्याचं दिसतंय. 'आम्ही रोजगार मिळावा म्हणून पाणीपुरी विकतो असे हे म्हणतात, पण पैशांच्या लालचेपोटी ते अशी कामे करतात आणि पैसे कमावतात, अशी कमेंट दुसऱ्या एका युजरने केलीय. बाहेरचे खाऊ नका, अशा अनेक कमेंट यूजर्स करत आहेत.