पटना : काँग्रेसने पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे. काँग्रेसने नीतीश कुमारांशी चर्चा करण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेस आपल्याकडून एक प्रस्ताव दिला की जर ते भाजपची साथ सोडतील तर काँग्रेससह इतर पक्ष त्यांना पाठिंबा देण्यासाठी विचार करु शकतात. काँग्रेसच्या खासदार रंजीत रंजन यांनी म्हटलं की, नीतीश कुमार यांच्याबाबतचं बिहारच्या प्रभारीचं वक्तव्य महत्त्वाचं आहे. डबल इंजिनचं सरकार बनली तर बिहारचं कायापालट होईल असं त्यांना वाटलं होतं पण तसं काहीच झालं नाही.
काँग्रेस नेता शकील अहमद खान यांनी इशारा दिला आहे की, नीतीश कुमार यांच्यासोबत चर्चा सुरु झाली आहे. आम्ही विचारांचं राजकारण करतो. जोपर्य़ंत ते भाजपसोबत आहेत तोपर्यंत माझं त्यांच्याबाबत कोणतंही मत नाही.
बिहारमध्ये काँग्रेस नेते शक्ती सिंह गोहिल यांनी रामविलास पासवान आणि उपेंद्र कुशवाहा यांचं उल्लेख करत म्हटलं की, राज्यात ही सामान्य भावना झाली आहे की, मोदी सरकार मागासलेल्या वर्गाच्या विरोधात आहे. त्यामुळे मागासलेल्या लोकांचा विचार करणाऱ्या नेत्यांना आणि पक्षाला त्यांची साथ सोडल्याशिवाय पर्याय नाही. नितीशकुमार जर महाआघाडीमध्ये येण्यास तयार असतील तर इतर सहकाऱ्यांसोबत यावर चर्चा केली जाईल.