मुंबई : यंदाच्या वर्षी सर्वच सणांवर कोरोनां सावट असलेलं पहायला मिळालं. त्यात नव्या कोरोनामुळे नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे यंदाचा ख्रिसमस अत्यंत साधेपणानं साजरा करण्यात येत आहे. नेहमी सर्वत्र मोठ्या उत्साहात सरकारी नियम पाळत यंदा नाताळ सण साजरा होतो. मुंबईच्या माऊंट मेरी चर्चमध्ये दरवर्षीप्रमाणे ख्रिसमस साजरा करण्यात येतो. मात्र य़ंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी नाही. चर्चमध्ये ऑनलाईन पद्धतीने येशूची प्रार्थना केली गेली.
मिनी गोवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसई तालुक्यात ख्रिस्ती बांधवांच्या घरोघरी परसबागेत नाताळ गोठा बनविण्यात आला. घरोघरी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली. नाताळच्या रात्री १२ वाजता चर्चमध्ये येशूचा जन्मदिवस साजरा केला जातो.
Goa: Midnight mass being held in Panaji's Our Lady of the Immaculate Conception Church on #Christmas.
Devotees attend the mass prayer while maintaining social distancing. pic.twitter.com/YU96ksGQLi
— ANI (@ANI) December 24, 2020
त्यापूर्वी प्रार्थना यामुळे चर्च गजबजलेली असतात मात्र यंदा ११ नंतरच्या संचारबंदीमुळे चर्च मधील प्रार्थनेच्या वेळा देखील बदलाव्या लागल्या आहेत. कल्याणातील सर्वात जुन्या १०३ वर्षाची परंपरा असलेल्या व्हर्नन या मराठी चर्चमध्ये देखील रात्री ८.३० ते १० दरम्यान ऑनलाईन प्रार्थना घेण्यात आली..
नाशिकच्या मनमाडमध्ये नाताळाच्या पूर्व संध्येला शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत ख्रिश्चन बांधवांनी साध्या पद्धतीने नाताळ सणाला सुरवात झाली. रात्री १० वाजता सामाजिक अंतर राखून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. तर कायरमध्ये मोजकेच लोक होते. चर्चमध्ये येण्यापुर्वी सॅनिटाझयर व मास्क बंधनकारक करण्यात आलं होतं. जगावर आलेले कोरोनारूपी संकट दूर व्हावे अशी विशेष प्रार्थना परमेश्वराजवळ करण्यात आली.