Video: माझी सीट, माझी जबाबदारी... भारतीयांचे ट्रेनमधून प्रवास करतानाचे जुगाड पाहून म्हणाला, 'What An Idea Sirji'

Train Viral Video: गेल्या काही दिवसांपासून रेल्वेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 5, 2024, 12:15 PM IST
Video: माझी सीट, माझी जबाबदारी... भारतीयांचे ट्रेनमधून प्रवास करतानाचे जुगाड पाहून म्हणाला, 'What An Idea Sirji' title=
Chhath Puja Man made sleeper seat swing for himself in crowd train

Train Viral Video: सणासुदीच्या दिवसांत लोकांना गावाकडे जाण्याचे वेध लागतात.  खासकरुन दिवाळी आणि छठ पूजेसाठी उत्तर भारतातील लोक गावाकडे जातात. प्रवाशांना गावाकडे जाण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे ट्रेन. मात्र सणासुदीच्या दिवसांत ट्रेनला प्रचंड गर्दी असते. कन्फर्म तिकिट मिळवण्यासाठी धावपळ करावी लागते. रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्यात येतात. मात्र, तरीदेखील तिकिट मिळेल याची शक्यता तशी कमीच असते. गेल्या काहि दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात लोकांनीच सीट मिळवण्यासाठी जुगाड केलेले दिसत आहेत. 

सोशल मीडियावर ट्रेनमधील काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. लोक कोणत्या ना कोणत्या पद्धतीने सीट मिळवण्यासाठी जुगाड करताना दिसत आहेत. कन्फर्म तिकिट न मिळाल्याने लोक मजेदार व अनोख्या पद्धतीने जुगाड करताना दिसत आहेत. हे व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. मात्र, त्याचबरोबर रेल्वेने या गर्दीवर तोडगा काढण्याची गरज असल्याचेही जाणवेल. गावी जाण्यासाठी लोकांनी केलेला जुगाड डोकं चक्रावणारा आहे. 

एका व्हिडिओत एक व्यक्ती गर्दीने खचाखच भरलेल्या ट्रेनच्या डब्यात स्वतःसाठी जागा करताना दिसत आहे. एक मोठा कपडा घेऊन सीटच्या मधोमध दोन्ही कडेला बांधून झोळी बनवत आहे. यात आरामात बसून सीटचा जुगाड करत आहे. हा व्हिडिओ कधीचा आहे याची मात्र काही खातरजमा झालेली नाहीये. तर, एका व्हिडिओत प्रवाशांना ट्रेनच्या बाथरुममध्ये उभं राहून प्रवास करताना दिसत आहे. ट्रेनच्या बाथरुममध्ये जवळपास पाच जण उभं असल्याचं दिसत आहे. भीषण गर्दी आणि सीट न मिळाल्यामुळं त्यांना असा प्रवास करावा लागत आहे. 

एका व्हिडिओत पाहू शकता की, कशाप्रकारे ट्रेन आल्यावर खिडकीतून आत जात आहे. फेस्टिव्हल सीझनमधीलच असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात लोक गावाला जाण्यासाठी जीव धोक्यात घालताना दिसत आहे. असाच एक मजेशीर व्हिडिओ म्हणजे एक व्यक्ती दोन सीटच्या मध्ये खाट विणताना दिसत आहे. जेणेकरुन त्याला झोपण्यासाठी जागा होईल. 

बिहारमध्ये छठ पूजा मोठ्याप्रमाणात साजरी केली जाते. त्यामुळं नियमित ट्रेनसोबतच स्पेशल ट्रेनदेखील चालवल्या जात आहेत. मात्र, तरीदेखील तिकीट उपलब्ध होत नाहीयेत. त्यामुळं लोकांना शौचालयात तर कधी खाली बसून प्रवास करावा लागत आहे.