मुंबई : Coronavirus अर्थात कोरोना विषाणूचा संसर्ग अतिशय झपाट्याने होत असल्यामुळे या आव्हानाच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठीच देशूत सरकार प्रयत्नशील आहे. रॅपिड टेस्टिंगग, थर्मल टेस्टिंग, कंटेन्मेंट झोन, हॉटस्पॉट, विलगीकरण अशा शक्य त्या सर्व परिंनी कोरोनावर मात करण्यासाठीचे निर्देश देण्यात येत आहेत. यामध्येच आता सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकत देशातील प्रत्येक नागरिकासाठी आता थेट एका बॉडीगार्डचीही व्यवस्था केली आहे.
खुद्द अभिनेता अजय देवगन यानेच याविषयीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. अजयचा हा व्हिडिओ गुरुवारी आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेतही दाखवण्यात आला.
जवळपास १३० कोटी नागरिकांसाठी सरकारने आणलेला हा बॉडीगार्ड नेमका आहे तरी कोण आणि तो नेमकं काम कसं करणार, हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? तर, कोट्यवधी नागरिकांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी सातत्याने सक्रिय असणाऱ्या या बॉडीगार्डचं नाव आहे 'आरोग्य सेतू. एका ऍपच्या स्वरुपात हा बॉडीगार्ड सतत तुमच्यासोबत राहणार असून, कळत नकळत तुम्ही कोणाही कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलात तर त्याबाबतही तुम्हाला सतर्क करणार आहे.
Dhanyawad @PMOIndia @narendramodi for creating a personal bodyguard for every Indian to fight COVID-19. #SetuMeraBodyguard hai aur aapka bhi.
Download @SetuAarogya now!
#IndiaFightsCoronahttps://t.co/fU7MfKfDwM pic.twitter.com/MHi7SMSTGD
— Ajay Devgn (@ajaydevgn) April 22, 2020
कोरोनाचा धोका तुम्हाला नेमका किती आहे, तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील काय परिस्थिती आहे इथपासून वेळोवेळी कोरोना व्हायरसबाबत सजग ठेवण्याचं काम हा ऍपरुपी बॉडीगार्ज करणार आहे. ज्याच्या जाहिरातीसाठी बॉलिवूड अभिनेता अजय देवगन याने योगदान दिलं आहे. अजयचा हा अंदाज आणि देशातील प्रत्येक नागरिकासाठी बॉडीगार्ड उपलब्ध करुन देण्याची सरकारची ही युक्ती कोरोनावर मात करण्यास कुठवत फायद्याची ठरेत हे पाहणं महत्त्वाचं असेल.