रामजन्मभूमी वादग्रस्त जमीन प्रकरण, आज युक्तिवादाचा अखेरचा दिवस

अयोध्या रामजन्मभूमी वादग्रस्त जमीन प्रकरणी खटल्याबाबत आज युक्तिवादाचा अखेरचा दिवस आहे. 

Updated: Oct 16, 2019, 10:18 AM IST
रामजन्मभूमी वादग्रस्त जमीन प्रकरण, आज युक्तिवादाचा अखेरचा दिवस

नवी दिल्ली : अयोध्या रामजन्मभूमी वादग्रस्त जमीन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात आज युक्तिवादाचा अखेरचा दिवस आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचे कालच्या सुनावणीत तसे संकेत दिले आहेत. सरन्यायाधीशांनी तीनही पक्षकारांना वेळ निर्धारीत केली आहे. वकील वैद्यनाथन यांना ४५ मिनिटं, मुस्लिम पक्षकारांना १ तास आणि प्रत्येकी ४५ मिनिटांचे ४ स्लॉट्स उरलेल्यांसाठी देण्यात आलेत. मंगळवारी अयोध्याप्रकरणी सुनावणीचा ३९ वा दिवस होता. तसंच सर्व पक्षकारांनी आपला युक्तिवाद बुधवारी पूर्ण करण्याचे आदेशही काल झालेल्या सुनावणीदरम्यान देण्यात आले होते. दरम्यान, या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

अयोध्या प्रकरणाची सुनावणी बुधवारी ४० व्या दिवसाच्या सुनावणीसह आज १६ ऑक्टोबरला पूर्ण होऊ शकते. कारण सर्वोच्च न्यायालयात बुधवारी हिंदू आणि मुस्लिम बाजूच्या उलटतपासणीचा शेवटचा दिवस आहे. आज चर्चा होण्याची शक्यता आहे. सुनावणी पूर्ण झाल्यास हा आदेशही आज राखीव ठेवण्यात येईल.

मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी (सीजेआय) १६ ऑक्टोबर रोजी सुनावणी पूर्ण करण्याचे संकेत दिले. या चर्चेसाठी हिंदू पक्षाचे वकील सी.एस. वैद्यनाथन यांना आज सीजेआयने ४५ मिनिटे दिली आहेत. मुस्लिम बाजूला एक तास देण्यात आला आहे. यासह, उर्वरित पक्षांना ४५ मिनिटांचे चार स्लॉट दिले जातील.

उल्लेखनीय बाब म्हणजे हिंदू बाजूचे वकील सी. एस. वैद्यनाथन यांनी सर्वोच्च न्यायालयात उलटतपासणीसाठी आणखी काही वेळ मागितला आहे. ते म्हणाले की बुधवारी मला उलटतपासणीसाठी ६० मिनिटे दिली. यावर सरन्यायाधीश म्हणाले की तुमचे लेखी युक्तिवाद कोर्टात द्या. वैद्यनाथन म्हणाले की कोर्टाने आमचे म्हणणे ऐकले पाहिजे, आम्ही गंभीर बाबींवर युक्तिवाद देत आहोत. यावर सरन्यायाधीशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि म्हणालेत ते ठीक आहे, मग दिवाळीपर्यंत सुनावणी घेऊ, असे सांगत फटकारले.