Aadhaar Card Free Update : सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासंदर्भात मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आधारकार्ड फ्री मध्ये अपडेट करण्याची संधी देण्यात आली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात UIDAI ने 14 डिसेंबर 2023 आधारकार्ड ऑनलाइन मोफत अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. यामुळे अद्याप आधारकार्ड अपडेट न केलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारने 10 वर्ष जूनं झालेलं आधार कार्ड अपडेट करणं बंधनकारक केलंय. तेव्हा आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट करण्यासाठी 14 जून शेवटची तारीख देण्यात आला होती. यानंतर ही यात 14 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलही होती. यानंतर आता 14 डिसेंबर 2023 मुदतवाढ देण्यात आलेय. आधारकार्ड ऑनलाइन मोफत अपडेट करु शकतो.
आधारकार्ड हे सध्या एक महत्वाचे ओळखपत्र आहे. बँकेत खाते उघडण्यासह विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील ओळखपत्र म्हणून आधारकार्ड सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, आता ज्यांचे आधारकार्ड 10 वर्षे जुनं आहे ते आधार कार्ड अपडेट करणे बंधनकारक असल्याची सूचना सरकारकडून जारी करण्यात आली आहे.
आधारकार्ड अपडेट करण्याची मुदत केव्हाच संपली आहे. यानंतर आता सरकारने आधारकार्ड अपडेट करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. आता 14 डिसेंबर 2023 आधारकार्ड अपडेट करता येणार आहे. myAadhaar पोर्टलच्या माध्यमातून घर बसल्याही ऑनलाईन आधारकार्ड अपडेट करता येवू शकते. ऑफलाईन आधारकार्ड अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क आकारले जाते. तर, ऑनलाईन आधारकार्ड अपडेट करण्यासाठी 25 रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र, आता ऑनलाईन आधारकार्ड अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ही सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करुन देण्यात आलेय.
प्रथम https://myaadhaar.uidai.gov.in/ लिंक वर जा.
लॉगिन केल्यानंतर, 'अपडेट नाव/लिंग/जन्म आणि पत्ता' या प्रमाणे पर्याय निवडा.
पत्ता अपडेट करायचा असेल तर अपडेट अॅड्रेसचा पर्याय निवडा.
ऑनलाईन आधारकार्ड अपडेट करत असताना जवळ मोबाईल ठेवा
अपडेट नाव/लिंग/जन्म आणि पत्ता जे अपडेट करायचे आहे त्यानुसार पर्याय निवडल्यावर मोबाईलवर OTP नंबर येईल.
मोबाईलनंबर सह OPT टाका आणि अपडेटचा पर्याय निवडा.
जेव्हा आधार अपडेट अप्रूव्ह होतील तेव्हा 14 अंकी अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) जनरेट होईल.
या नंबरद्वारे तुम्ही तुमच्या आधारमध्ये केलेल्या अपडेट्सचा स्टेटस चेक करु शकता.