मुंबई : एड्स (जागतिक एड्स दिन) हा एक असाध्य रोग आहे. याला आळा घालण्यासाठी सध्याच्या घडीला जनजागृती हाच एकमेव पर्याय आहे. या जीवघेण्या आजारापासून लोकांना वाचवण्यासाठी 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो.
पूर्वी एड्स या आजाराबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज होते. पण आता या आजाराशी संबंधित अनेक गैरसमज लोकांच्या मनातून दूर झालेले काही प्रमाणात दिसतात. मात्र, मागासलेल्या देशांबद्दल बोलायचं झालं तर या देशांची परिस्थिती अजून सुधारलेली नाही. व्यक्तींपासून व्यक्तींमध्ये पसरणारा हा आजार जगात पहिल्यांदा कसा पसरला हे जाणून तुम्ही थक्क व्हाल.
जागरूकता पसरवल्यानंतर, बहुतेक लोकांना हे माहित आहे की, असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे एड्स पसरतो. याशिवाय एचआयव्हीचा विषाणू संक्रमित व्यक्तीला दिलेल्या इंजेक्शननेही पसरतो. परंतु बहुतेक लोकांना हे माहित नाही की, हा विषाणू प्रथम मानवांमध्ये कसा पसरला? हा विषाणू प्राणघातक आहे. त्याचे उपचार सापडलेले नाहीत.
एड्सचा प्रसार सर्वप्रथम चिंपांझींद्वारे मानवांमध्ये झाला. एचआयव्ही हा एक धोकादायक विषाणू आहे जो प्रथम चिंपांझीमध्ये आढळला होता. मात्र प्रश्न अशा आहे की, हा विषाणू माणसात कसा पसरला? जर हा विषाणू चिंपांझीमध्ये होता तर तो मनुष्यात कसा पसरला?
एचआयव्ही बाधित चिंपांझी 1920 मध्ये काँगोच्या कॅमेरोनियन जंगलात सापडला होता. 1920 मध्ये या चिंपांझीने जंगलात शिकार करायला गेलेल्या माणसावर हल्ला केला. शिकारीने यापूर्वी एका चिंपांझीला जखमी केलं होतं. यानंतर चिंपांझीने शिकारीवरही हल्ला केला. अशा प्रकारे दोघांचे रक्त मिसळले आणि हा विषाणू चिंपांझीपासून माणसात पसरला अशी नोंद आहे.
दरम्यान यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या अहवालाने ही गोष्ट चुकीची मानली आहे. त्यांच्या मते समलिंगी जोडप्यामुळे एड्सचा प्रसार जगात झाला.
एका अहवालानुसार, 1981मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये 5 तरुणांना या विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं. दुसरीकडे एड्सच्या पहिल्या नोंदवलेल्या केसबद्दल बोलायचं झालं फ्लाइट अटेंडंट गेटन हा एचआयव्हीचा पहिला रुग्ण असल्याचं मानलं जातं.