डॉ. संतोष करमरकर, बालरोग सर्जन, संस्थापक आणि विश्वस्त - स्पायना बिफिडा फाउंडेशन इंडिया: स्पाइना बिफिडा ( Spina Bifida ) हा एक जन्म दोष आहे ज्यामध्ये गर्भधारणेच्या सुरुवातीच्या विकासादरम्यान पाठीचा कणा आणि पाठीच्या कण्याभोवतीचा पडदा अपूर्ण स्वरूपात बंद होऊन बाळाच्या पाठीचा कण्याची गर्भाशयात नीट वाढ न होता पाठीच्या कण्याच्या त्वचेवर दोष असलेल्या ठिकाणी केसांचा असामान्य गुच्छ, केसाळ ठिपके, डिंपल, गडद डाग किंवा पाठीच्या मणक्यातील अंतराच्या ठिकाणी सूज, जन्मखुणाच्या किंवा पाठीच्या कण्यातील ऊतींची अतिरिक्त वाढ होऊन मोठा गळू तयार होणे अशी लक्षणे दिसू शकतात.
२५ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक स्पाइना बिफिडा दिवस’ ( Spina Bifida ) म्हणून साजरा केला जातो. आम्ही या गंभीर विकाराबद्दल सामाजिक जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहोत जे अनेक पालकांना माहीत नाही. स्पाइना बिफिडा ( Spina Bifida ) हा भारतातील सर्वात सामान्य जन्मजात दोष असून अनेक पालकांच्या लक्षात येत नाही. दरवर्षी ४०,००० पेक्षा जास्त बालके या जन्मजात दोषाने (स्पाइना बिफिडा) ( Spina Bifida ) जन्म घेतात ज्यामुळे बालपणातच बाळाला पोलिओपेक्षा गंभीर असा पक्षाघातास (Paralysis) सामोरे जावे लागते
स्पाइना बिफिडा ( Spina Bifida ) हा पोलिओपेक्षा गंभीर असा विकार मानला जातो, याचं कारण म्हणजे यामुळे बालकांमध्ये या समस्या दिसून येतात.
मेंदूमध्ये जास्त पाणी (हायड्रोसेफलस)
मूत्र आणि आतड्यांसंबंधी असंयम (नियंत्रण नसणे)
ऑर्थोपेडिक समस्या जसे की क्लब फूट
इतर विकृती.
हा लेख पालकांना स्पाइना बिफिडा बद्दल काय स्थिती आहे याची जाणीव करून देण्यासाठी आहे आणि पुढील आठवड्यात आम्ही स्पाइना बिफिडा कसे रोखू शकतो त्याबद्दल सविस्तर माहिती देऊ.