वजन पटापट कमी करायचंय? वापरा 'हे' herbs

सध्या ग्रीन टी, ब्लॅक टी या आणि अशा अनेक प्रकारच्या चहा, डिटॉक्स काढे या उपायांवर भर दिला जात आहे, पण... 

Updated: Oct 10, 2022, 08:21 AM IST
वजन पटापट कमी करायचंय? वापरा 'हे' herbs  title=
use 5 herbs for rapid weight loss

Weight Loss : आरोग्य आणि त्याच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक घटकाविषयी सध्यासर्वजण बरेच सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे. धकाधकीच्या आयुष्यात जीवनशैलीमध्ये अनभिज्ञपणे होणारे बदल आणि त्याचे गंभीर परिणाम पाहता आता आरोग्यही केंद्रस्थानी आलं आहे. आरोग्याविषयी सांगावं तर, वाढतं वजन नियंत्रणात आणण्यासाठीच अनेकजण धडपडत आहेत. ग्रीन टी, ब्लॅक टी या आणि अशा अनेक प्रकारच्या चहा, डिटॉक्स काढे या उपायांवर भर दिला जात आहे. पण, तुम्हाला माहितीये का? अगदी इवलीशी पानं आणि हर्ब्ससुद्धा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, वाढलेलं वजन कमी करण्यासाठी मोठी मदत करतात. यांचे फायदे इतके की, सहजपणे तुम्हाला जर त्यांची रोपं दिसली तर लगेचच ती घरात लावाल. (Herbs to loose weight)

रोजमेरी (rosemary) - रोजमेरीचं रोप तुम्हाला सहजपणे वजन (Weight) कमी करण्यासाठी मदत करेल. या इवल्याशा पानांमध्ये मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सिडेंट असल्यामुळं त्याचे एंटी इंफ्लेमेंटरी गुणही बरेच फायद्याचे. वजन कमी करण्यासाठी त्याची बरीच मदत होते. 

रोजमेरीची पानं पाण्यात उकळवून त्याचा काढा प्यायल्यास वजन कमी करण्यास त्याची मोठी मदत होते. 

कोरफड (Alovera)- वाचून हैराण व्हाल, पण कोरफडाचा वापर केस आणि त्वचेचं सौंदर्य जपण्यासोबतच वजन कमी करण्यासाठीही केला जातो. पोटाशी संबंधीत बऱ्याच समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कोरफडीला वापर केला जातो. यासाठी सकाळी उपाशीपोटी कोरफडचा रस प्या. 

स्टिवीया किंवा गोड तुळस (Stevia)- नैसर्गिक गोडवा आणण्यासाठी अनेकजण पदार्थांमध्ये स्टिवीया म्हणजेच गोड तुळशीचा वापर करतात. याची पानं साखरेहून जास्त गोड असतात. या लहानशा वनस्पतीचा वापर वजन कमी करण्यासोबतच ते नियंत्रणात ठेवण्यासाठी केला जातो. यामध्ये कॅलरीज नसल्यामुळं अनेकजण स्टिवीयाला प्राधान्य देतात. शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठीही त्याचा वापर होतो. 

अधिक वाचा : Sugar Level Chart: वयानुसार साखरेची पातळी किती असावी? मधुमेह टाळण्यासाठी चार्ट

 

पुदीना- (Mint) पुदीन्यामध्ये असणारी पोषक तत्त्वं मेटाबॉलिजम वाढवून स्थूलता कमी करण्यास मदत करतात. आयुर्वेदात सांगितल्यानुसार पुदीन्याची काही पानं बारीक करून त्याचा रस गरम पाण्यातून प्यायल्यास वजन कमी होतं. 

पेरूची पानं- पेरूच्या पानांचाही वापर बऱ्याच औषधांमध्ये गेल्या कैक वर्षांपासून केला जात आहे. या पानांमध्ये एंटीऑक्सिडेंट असल्यामुळं त्यांचा काढा प्यायल्यास शरीरातील नकोशी चरबी कमी होते.