मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत दुसऱ्यांदा मातृत्वाच्या वाटेवर आहे. मीराची ही गुड न्यूज शाहिदने सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांना दिली. तेव्हापासून मीरा राजपूत सतत चर्चेत आहे. ऑक्टोबरमध्ये ती तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. प्रेग्नेंसीदरम्यान मीरा बीटाचा चहा पित असल्याचे तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. पण बीटाच्या चहाचा नेमका फायदा काय? आणि प्रेग्नेंसीमध्ये हा चहा पिणे का फायदेशीर ठरते? जाणून घेऊया...
# प्रेग्नेंसीच्या पहिल्या तीन महिन्यात बीटाच्या चहाचा आहारात समावेश करायला हवा. कारण त्यातील फॉलिक अॅसिड गर्भाच्या वाढीसाठी अतिशय फायदेशीर ठरतं. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतं.
# बीटात भरपूर प्रमाणात आयर्न असतं. त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरुन निघते. त्यामुळे प्रेग्नेंसीदरम्यान रक्ताची कमतरता जाणवल्यास ताबडतोब बीटाचे सेवन सुरु करा.
# बीटाच्या चहात व्हिटॉमिन सी असतं. यामुळे प्रसूती सहज होण्यास मदत होते. याशिवाय रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
# बीटात असलेल्या betaine मुळे पचनतंत्र सुधारते. त्याचबरोबर पोटातील अॅसिड (stomach acid)ची निर्मिती होण्यास मदत होते.
# त्वचेवर नैसर्गिक तजेला टिकून राहण्यास बीटाचा चहा अतिशय उपयुक्त ठरतो. कारण बीटामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. बीटात व्हिटॉमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने त्वचा नितळ होते.
# बीटात नायट्रेड्स असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. मेंदू, स्नायू आणि हृदयाला ऑक्सिजनचा उत्तम पुरवठा होतो.
नोट- बीटाच्या चहाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. तरी देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने याचा आहारात समावेश करावा.