मुंबई : केवळ उच्च रक्तदाबाचा त्रास धोकादायक असतो असे नाही. लो बीपीदेखील आरोग्याला धोकादायक आहे. त्यामुळे धावपळीच्या आणि तणावग्रस्त होत चाललेल्या आजच्या जीवनशैलीमध्ये तुम्हांला लो बीपीचा त्रास असल्यास त्याकडेही अधिक काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचे आहे.
पाणी प्या : ओआरएस नसल्यास पाणी प्या. पाण्यामध्ये थोडं मीठ आणि चमचाभर साखर मिसळा. मिठातील सोडीयम रक्तदाब नियंत्रित करतो तर साखर ग्लुकोज वाढवायला मदत करते.
मीठ चाखा : रक्तदाब कमी झाल्यास मीठ चाखणे किंवा खारी बिस्किटं खाणं हा देखील उपाय करु शकतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते. यासोबत तुम्ही साखर-मीठाचे पाणी पिऊ शकतात. पण हे अती प्रमाणात घेऊ नका. यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.
डॉक्टरांचा सल्ला : रक्तदाब स्थिरावल्यानंतर सामान्य झालात की डॉक्टांचा सल्ला घ्या. रक्तदाब कमी का झाला? याचे निदान होणे गरजेचे आहे. रक्तदाबाकडे दुर्लक्ष करू नका याचे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्यास नियमित तपासून घ्या.