मुंबई : लेप्टोस्पायरोसिस हे एक बॅक्टेरियल इंफेक्शन आहे. पावसाच्या पाण्यात ‘लेप्टोस्पायरोसिस’ या रोगाच्या सूक्ष्मजंतूचा प्रादुर्भाव असू शकतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी इत्यादी प्राण्यांच्या मूत्रातून लेप्टोचे सूक्ष्मजंतू पावसाच्या पाण्यात संसर्गीत होतात. साचलेल्या पाण्यातून चालल्यानंतर शरीरातील जखमा, ओरखड्यांच्या माध्यमातून हे बॅक्टेरिया शरीरात जातात. क्वचित प्रसंगी हे इंफेक्शन माणसातून पसरू शकते.
लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे:
लॅप्टोची लागण झाल्यानंतर डोकेदुखी, उलट्या, स्नायूंचे दुखणे, थंडी वाजणे अशा समस्या वाढतात. लॅप्टोच्या लक्षणांकडे मूळीच दुर्लक्ष करू नका. वेळीच उपचार केल्यास या आजारावर मात करता येऊ शकते. अन्यथा हा आजार जीवघेणा ठरू शकतो. त्यासाठी वेळेतच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
लॅप्टो आजारावर काही घरगुती उपाय
- लॅप्टोचा त्रास अतिशय गंभीर असल्यास शरीरातील अनेक अवयवांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. अशावेळेस शरीरात पाण्याचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. मीठ, साखर आणि पाण्याचे मिश्रण पिणे फायद्याचे ठरते.
- लॅप्टोसोरायसिसचा त्रास आटोक्यात आणण्यासाठी आलं अत्यंत फायदेशीर आहे. आल्यातील दाहशामक घटक अवयवांचं नुकसान टाळण्यासाठी मदत करते असे एका प्रयोगातून समोर आलं आहे. आहारात सूप, डाळ यांच्यामध्ये आल्याचा वापर करा.
- हळदीमध्ये दाहशामक गुणधर्म असतात. त्यामुळे लेप्टोस्पायरोसिसचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी हळद अत्यंत फायदेशीर आहे.
- उंदीर किंवा इतर उपद्रवी प्राणी कचर्यांकडे अधिक आकर्षित होतात. त्याअमुळे पावसाळ्याच्या दिवसात घाणीचं साम्राज्य पसरू नये याकडे लक्ष देणं गरजेचे आहे.
- पावसाळ्याच्या वर्षासहलींमध्ये किंवा फीटनेस रीजिमचा एक भाग म्हणून स्विमिंग करत असाल तर काळजी घ्या. स्विमिंग करण्यापूर्वी पाणी स्वच्छ आहे की नाही ? याची खात्री करून घेणं आवश्यक आहे. तुमच्या त्वचेवर जखमा असतील तर पावसाळ्यात स्विमिंग करताना काळजी घ्या.