मुंबई : आजच्या काळात लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनलीये. आजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीत आपण आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेऊ शकत नाही. ज्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. लठ्ठपणामुळे शरीरात अतिरिक्त फॅट जमा होतं. लठ्ठपणामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांमुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. जर तुम्हालाही लठ्ठपणाचा धोका असेल तर तुम्ही जीवनशैलीत काही बदल करू शकता. जीवनशैलीत बदल करून तुम्ही लठ्ठपणा लवकर कमी करू शकता. जाणून घेऊया हे बदल कोणते आहेत.
जीवनशैलीत करा हे बदल
लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्ही रोज व्यायाम केला पाहिजे. व्यायामामुळे तुमचे स्नायू टोन होतात आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे दिवसभरात किमान 45 मिनिटं दररोज व्यायाम केल्यास तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी दररोज 7 ते 8 तासांची झोप घेणं आवश्यक आहे. पुरेशी झोप घेतल्याने तुमचं शरीर निरोगी राहतं. चयापचय संतुलन साधण्यासाठी दररोज पुरेशी झोप घेतली पाहिजे. यामुळे लठ्ठपणाची समस्या टाळता येऊ शकते.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्ही सकस आहार घेतला पाहिजे. सकस आहार घेतल्यास आपले शरीर निरोगी राहतं, ज्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यासही मदत होते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी तळलेले, साखर आणि कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांपासून दूर रहा. त्याचसोबत हिरव्या भाज्या आणि फळं अधिक खा.