मुंबई : एक मधमाशी जास्तीतजास्त २५ किलोमीटर प्रति तास वेगाने उडू शकते. तसेच एक सेकंदात २०० वेळा आपले पंख फडफडवते. मधमाशांची वास घेण्याची क्षेमता माणसांपेक्षाही जास्त असते. एक मधमाशी तिच्या पूर्ण जीवनात एक चमच्याच्या फक्त १२ वा भाग मध तयार करते. १ ग्रॅम मध बनवण्यासाठी मधमाशी तब्बल १९५ किलोमीटरचा प्रवास करते, म्हणजे हे अंतर मुंबई आणि पुणे या दरम्यानच्या अंतरापेक्षाही ५० किमी जास्त आहे. मधमाशा ( Honey Bees)पृथ्वीवर अनेक शतकापासून मध तयार करण्याच काम करतात. मधमाशांनी तयार केलेल्या मधापासून अनेक फायदे आहेत. मध खाल्ल्याने अनेक व्याधी दूर होतात.
मधात अनेक पौष्टीक तत्व,आणि विटामिन असतात. अत्यंत महत्वाचे म्हणजे अँटिबॅक्टीरिया आणि अँटीसेप्टिक गुण असतात.
ते अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. मानव जातीसाठी अमृताहूनही गोड अशी भेट देणाऱ्या माशा, हे एक चमचा मध तयार करण्यासाठी संपूर्ण जीवन घालवतात. म्हणजे एक चमचा मध ही एका मधमाशीची आयुष्याची कमाई आहे. यातही आता मधमाशांविषयी खालील मुद्दे अतिशय महत्त्वाची माहिती देत आहेत.
१ ) पृथ्वीवर मधमाशीचं अस्तित्व अनेक शतकांपासून राहत आहे, आणि ते मध बनवण्याचं काम करीत आहेत.
२) मधमाशांच्या २० हजारपेक्षा जास्त प्रजाती आहेत. त्यातील फक्त पाचच प्रजाती हे मध तयार करतात.
३) एका मधमाशाच्या पोळ्यात ५० हजारांच्या संख्येत मधमाशा असू शकतात. त्यांचा जो भाग आहे तो मेणाने बनलेला असतो. ते मेण त्यांच्या पोटाच्या ग्रंथीपासून निघालेलं असतं.
४) एका भागावर फक्त तीनच प्रकारच्या मधमाशा राहतात. या व्यतिरिक्त एक मधमाशांच्या पोळ्यात हजारांच्या संख्येत मादी मधमाशा राहतात. या व्यतिरिक्त यात लाखो
नर मधमाशा आणि एक राणी मधमाशी असते.
५) मधमाशांच्या पोळ्यात राहणाऱ्या वरील मधमाशा यांना कामगार माशी म्हटलं जातं. कारण त्या मध तयार करण्याच काम करतात. नर मधमाशा या मादी मधमाशी सोबत फक्त संबंध ठेवण्यासाठी असतात.
६) तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की मधमाशाच्या पोळ्यात राहणारे लाखो नर मधमाशी, मादी मधमाशांचा गर्भपात करण्याचा प्रयत्न करतात ,परंतु यांतील एकच नर यात यशस्वी होतो.
७) मधमाशाच्या पोळावर केवळ मादी मधमाशी ही अंडे घालतात. ते एका दिवसात २ हजारापेक्षा जास्त अंडी घालतात. उन्हाळ्याच्या दिवसात प्रजनन करताना तब्बल २५०० पर्यंत देखील हा आकडा जातो.
८) मधमाशीचं जीवन जास्तीत जास्त एक महिना असतं. विशेष म्हणजे राणी माशी कित्येक वर्ष जिवंत राहू शकते. याचं वजन आणि आकार इतर मधमाशी यांच्यापेक्षा तुलनेने जास्त असतं.
९) मधमाशी यांना ४५४ ग्राम मध बनवण्यासाठी ५५ हजार किलोमीटरचा प्रवास करावं लागतयं. आपण याला काही दिवसातच खाऊन टाकतो.
१०) एक मधमाशी जास्तीत जास्त २५ किलोमीटर प्रतितास या वेगाने उडू शकते, ही माशी एका सेकंदात २०० वेळा आपले पंख फडफडवू शकते.
११) मधमाशांची वास घेण्याची क्षमता माणसापेक्षा जास्त असते. एक मधमाशी आपल्या संपूर्ण जीवनात चमच्याचा १२ वा भाग एवढंच मध बनवू शकते.
१२) मधमाशांन ४५४ ग्रँम मध बनवण्यासाठी ५५ हजार मैल म्हणजेच ८८ हजार ५१४ किलोमीटर जावं लागतं. पण आपण एवढं मध काही दिवसात फस्त करतो.