होमिओपॅथी की अ‍ॅलोपॅथी; आपल्यासाठी योग्य काय? संशोधनातून धक्कादायक बाब समोर

Homeopathy vs Allopathy Medicine : अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेद देशभरात वेगवेगळ्या उपचार आपल्याला पाहिला मिळतात. लोक आपल्या विश्वासानुसार हे उपचार घेतात. अ‍ॅलोपॅथी आणि होमिओपॅथीमध्ये काय बेस्ट आहे?, याचं उत्तर अखेर मिळालंय. 

नेहा चौधरी | Updated: Oct 22, 2024, 02:17 PM IST
होमिओपॅथी की अ‍ॅलोपॅथी; आपल्यासाठी योग्य काय? संशोधनातून धक्कादायक बाब समोर title=
Homeopathy or Allopathy What is right for health shocking thing came out of the research

Homeopathy vs Allopathy Medicine : अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेद उपचार करणारे अनेक क्लिनिक गल्लोगल्ली दिसतात. विश्वास आणि आजाराचे गांभीर्य पाहून लोक हे उपचार घेतात. अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी या दोघांची उपचार पद्धती फार वेगळी असते. अ‍ॅलोपॅथिक औषधांमध्ये, घन, द्रव आणि वायू या तिन्ही अवस्थेत संयुग वापरले जातात. तर होमिओपॅथिक औषधं सामान्यतः पातळ केली जातात ज्यामुळे त्याचं दुष्परिणाम नगण्य असतात. शा परिस्थितीत कोणती वैद्यकीय पद्धत चांगली याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो. पण एका संशोधनातून यांचं उत्तर मिळालंय. (Homeopathy or Allopathy What is right for health shocking thing came out of the research)

होमिओपॅथी की अ‍ॅलोपॅथी; आपल्यासाठी योग्य काय?

युरोपियन जर्नल ऑफ पेडियाट्रिक्समध्ये प्रकाशित अहवालानुसार, होमिओपॅथी औषधं हे 2 वर्षांखालील मुलांच्या सामान्य आजारांमध्ये अ‍ॅलोपॅथीपेक्षा श्रेष्ठ आहेत. तेलंगणातील जीर इंटिग्रेटेड मेडिकल सर्व्हिसेस (JIMS) आणि सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी (CCRH) च्या संशोधकांनी हा अभ्यास केलाय. या अभ्यासात 24 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या 108 मुलांवर प्रयोग करण्यात आला. या मुलांवर नियमितपणे होमिओपॅथी किंवा अ‍ॅलोपॅथी माध्यमातून ताप, अतिसार, श्वसन समस्यांवर उपचार करण्यात आले. जेव्हा होमिओपॅथीद्वारे उपचार केले जात होते तेव्हा त्यांच्या पालकांनी देखील इतर पारंपरिक पद्धतींचा अवलंब केला. असे असूनही, संशोधकांना अभ्यासात असं आढळून आलं की होमिओपॅथीद्वारे उपचार करण्यात आलेली मुले अ‍ॅलोपॅथीद्वारे उपचार घेतलेल्या मुलांपेक्षा कमी आजारी पडतात. अभ्यासात असं म्हटलंय की 24 महिन्यांपेक्षा कमी वयाची मुलं ज्यांवर होमिओपॅथीद्वारे उपचार केले गेले होते ते सरासरी 5 दिवस आजारी पडले, तर पारंपारिक उपचार गटातील मुलं सरासरी 21 दिवस आजारी राहिली.

 

हेसुद्धा वाचा - वेदनादायी आजाराला तोंड देतेय Anushka Sharma; Bulging Disc म्हणजे काय अन् लक्षणं कशी ओळखावी?

 

प्रतिजैविकांची कमी गरज

अभ्यासातून असेही दिसून आले की होमिओपॅथिक उपचारांमध्ये ज्या मुलांना प्रथम प्राधान्य देण्यात आले त्यांना श्वसनाच्या समस्या कमी होत्या आणि उपचारानंतरही त्यांना कमी त्रास सहन करावा लागला. तर औषधांचे दुष्परिणाम आणि रोगांमुळे होणारे मृत्यू यांसारख्या दोन्ही माध्यमांनी उपचार घेतलेल्या मुलांमध्ये कोणताही महत्त्वाचा फरक आढळला नाही. होमिओपॅथीतून उपचार घेणाऱ्या मुलांमध्ये आणि इतर मार्गाने उपचार घेत असलेल्या मुलांमध्ये बरे होण्याची शक्यता कितपत चांगली आहे, हेच अभ्यासात दिसून आले. अभ्यासात असेही आढळून आलं की होमिओपॅथिक पद्धतींनी उपचार केलेल्या मुलांमध्ये केवळ 14 वेळा प्रतिजैविकांची आवश्यकता होती, मात्र इतर मार्गांनी उपचार केलेल्या मुलांमध्ये 141 वेळा प्रतिजैविकांची आवश्यकता होती. याचा अर्थ असा की ज्या मुलांवर होमिओपॅथिक उपचार केले गेले त्यांची प्रतिकारशक्ती अधिक वाढली गेल्याच पाहिली मिळालं.