Tips for Cutting Down on Sugar: वजन कमी करत असताना किंवा मधुमेहाच्या रुग्णांना नेहमीच गोड कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र गोड कमी करणे व जीभेवर नियंत्रण ठेवणे अनेकांना कठिण जाते. ओघाओघात प्रमाणापेक्षा जास्त गोड खाल्लं जातं. मग कधीकधी शुगर जास्त होते तर वजनही वाढू लागते. गोड खाण्याबाबत जीभेवर ताबा ठेवणे खूप कठिण आहे. मात्र, या सोप्या टिप्स वापरल्यास तुम्ही आरामात जिभेवर नियंत्रण ठेवून गोड कमी करु शकता. कसे ते जाणून घेऊया.
वजन कमी करण्यासाठी फास्ट, जंक फुडसोबतच साखर कमी करण्यास सांगितले जाते. अनेकदा शीतपेय, सॉस किंवा नाश्त्याशी संबंधित पदार्थांमध्ये साखर असते. अशावेळी गोड पदार्थ किंवा साखर कमी करणे हे कठिण होऊन बसते. त्यामुळं आम्ही दिलेल्या सात टिप्स नक्कीच आजमावून पाहा.
बाजारात असे अनेक ड्रिंक्स असतात ज्यामध्ये शुगर कंटेट खूप मोठ्या प्रमाणात असतात. एनर्जी ड्रिंक्स, स्पोर्ट ड्रिंक्स, स्मूदीज आणि बाजारात मिळणारे फ्रुट ज्यूस यांचादेखील समावेश आहे. अशावेळी हे ड्रिंक्स पिणे टाळावे.
बाजारातून सॉस खरेदी करण्याआधी त्यात कोणते कोणते पदार्थ वापरण्यात आले आहे हे तपासून घ्या. कॅचअप, बारबेक्यू सॉस, स्पेगेटी सॉस आणि स्वीट चिली सॉससारख्या सॉसचा समावेश असतो. यामध्ये शुगर कंटेट खूप जास्त असतो. अशा सॉसच्या ऐवजी ज्यामध्ये शुगर कंटेट कमी असेल असे सॉस निवडा.
तुम्ही वजन कमी करण्यावर भर देत असाल तरीदेखील शरीरासाठी फॅट असणे गरजेचे आहे. अनेकदा लो फॅट फूडपण असे असतात ज्यात फॅट जरी कमी असले तरी त्यात शुगर कंटेट जास्त असतो. जसं की लो फॅट व्हेनिला योगर्टमध्ये 170 ग्राममध्ये 24 ग्रॅम साखर असते. तर, फुल फॅट योगर्टमध्ये नेच्यरल मिल्क शुगर फ्री असते.
जास्त रिफाइंड खाण्याऐवजी होल फूड खाण्यावर फोकस करा. प्रोसेस्ड आणि रिफाइंड फूड जास्त नुकसानदायक असते. त्या ऐवजी फळे, डाळ, होल ग्रेन आणि भाज्या खाण्यावर भर द्या.
जास्तीत जास्त प्रोटीनुक्त पदार्थ सेवन केल्यास गोड खाण्याची इच्छा कमी होते. मेटाबॉलिजमदेखील वाढते आणि पोट नेहमी भरल्यासारखे वाटते. प्रोटीनची कमतरता असल्यास शरीरात अशक्तपणा जाणवतो.
गोड खाण्याची जास्त आवड असेल तर त्यावर आत्ताच आळा घाला. त्याची सुरुवात घरापासूनच करा. सगळ्यात पहिले जास्त प्रमाणात साखर असलेले पदार्थ घरी आणणे बंद करा. घरात असे पदार्थ आणणे बंद केले तर आपोआपच गोड खाण्याचे क्रेव्हिंग बंद होईल
झोप चांगली घेतली तर तुमच्या खाण्याच्या सवयीवरही त्याचा परिणाम दिसून येते. चांगली झोप ही गोड खाण्याच्या इच्छेवर नियंत्रण मिळवू शकते. त्यामुळं पूर्ण आठ तास झोप घ्या.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)