आवळ्याने दूर करा केसांंच्या समस्या

अनेक आयुर्वेदीक औषधांमध्ये आवळ्याचा समावेश असतो. तसेच रोज किमान एक आवळ्याचा तुकडा खाण्याचा सल्लाही देण्यात येतो. पण यामगील नेमके कारण  तुम्हाला ठाऊक आहे का? आवळ्यामधील पोषणद्रव्यं शरीर  निरोगी ठेवण्यास मदत करतात. आवळ्यातून शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटामिन सी मिळते पण आवळ्यामुळे लिव्हर (यकृतही) निरोगी राहते. हे तुम्हाला ठाऊक आहे का ?

Updated: Dec 16, 2017, 10:53 PM IST
आवळ्याने दूर करा केसांंच्या समस्या  title=

मुंबई : अनेक आयुर्वेदीक औषधांमध्ये आवळ्याचा समावेश असतो. तसेच रोज किमान एक आवळ्याचा तुकडा खाण्याचा सल्लाही देण्यात येतो. पण यामगील नेमके कारण  तुम्हाला ठाऊक आहे का? आवळ्यामधील पोषणद्रव्यं शरीर  निरोगी ठेवण्यास मदत करतात. आवळ्यातून शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटामिन सी मिळते पण आवळ्यामुळे लिव्हर (यकृतही) निरोगी राहते. हे तुम्हाला ठाऊक आहे का ?

केसांतील कोंडा कमी होतो  

आवळा हे एक उत्तम हेअर कंडीशनर आहे. पण त्याचबरोबर केसातील कोंडा कमी करण्यासही आवळा मदत करतो.

आवळा पेस्ट 

आवळ्याची पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट टाळूवर लावावी.
30 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवावेत.
तुम्ही आवळा सुकवून साठवूनही ठेवू शकता.

आवळा - लिंबू पेस्ट 

गरजेनुसार सुकलेला आवळा पाण्यासोबत वाटून त्यात चमचाभर लिंबाचा रस मिसळावा.
ही पेस्ट टाळूवर लावून शिकाकाईच्या पावडरने केस धुवावेत.
केसातील कोंडा कमी करण्यासाठी आवळ्यासोबत तुळशीची पानेही फायदेशीर आहेत.

आवळा आणि तुळस 

आवळा पावडरमध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट बनवावी.
अंदाजे 10 तुळशीच्या पानांचा रस काढून तो आवळ्याच्या पेस्टमध्ये मिसळावा.
हे मिश्रण केसांच्या मुळांशी लावून 30 मिनिटांनी केस पाण्याने स्वच्छ धुवावेत.
नैसर्गिकरित्या चमक देतात 

आवळा आणि हीना 

अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आवळा फारच फायदेशीर आहे. आवळ्यामुळे केसांना रंग चढत नाही पण हीनामध्ये आवळा मिसळल्याने त्याचा अंतिम परिणाम सुधारतो. केसांना हीना (मेहेंदी) लावल्यानंतर केसांना चमक मिळण्यास मदत होते. केसांना मेहेंदी लावताना, आवळा पावडर सगळ्यात शेवटी म्हणजेच केसांना मेहेंदी लावताना मिसळावी. 

केसांचे समूळ पोषण करते 

‘व्हिटामिन ए’ ने परिपूर्ण असलेला आवळा, शारीरिक आरोग्यासोबतच केसांचे आरोग्य सुधारण्यासही मदत  करतात. आवळ्यामुळे केसांना चमक मिळते, टाळूवरील शुष्कता कमी होते. तसेच केस  मऊसुद  होण्यास  मदत होते. तसेच आवळ्यांमुळे केसांना फॅटी अ‍ॅसिडचा पुरवठा होतो परिणामी केसांची मूळं मजबूत होतात.

आवळा पावडरमध्ये पाणी मिसळून त्याची पेस्ट रात्रभर भिजत ठेवा. दुसर्‍‍या दिवशी सकाळी आवळ्याची पेस्ट केसांना लावून काही तासांनंतर केस सौम्य  शाम्पूने धुवावेत.
स्किन एजिंगची समस्या कमी होते 

आवळ्याच्या रसात ‘व्हिटामिन ए’ चे प्रमाण मुबलक असते. ‘व्हिटामिन ए’मुळे कोलेजनची निर्मिती वाढते. यामुळे त्वचा चिरतरूण राहते.
रिकाम्या पोटी आवळा खाल्ल्याने कोलेजन घटण्याची शक्यता कमी होते व शरीरात कोलेजनची निर्मिती वाढते. रोज आवळ्याचा रस बनवणे शक्य नसल्यास, बाजारात मिळाणारा तयार आवळ्याचा रस रोज सकाळी प्यावा.