मुंबई : मधुमेह हा आजकाल अगदी सामान्य झालेला आजार आहे. भारताला तर मधुमेहींची राजधानी म्हणून संबोधले जाते. बदललेली जीनवशैली, अपूरी झोप, जेवणाच्या अयोग्य वेळा, ताणतणाव, व्यायामाचा अभाव यांसारखे अनेक बदल मधुमेहास कारणीभूत ठरतात. मधुमेह जडल्यानंतर कायम खाण्यापिण्याची पथ्यं पाळावी लागतात. पण अशी काही फळे आहेत जी मधुमेही अगदी बिनधास्त खाऊ शकतात.
जांभूळ मधुमेहींसाठी अगदी उपयुक्त फळ मानले जाते. त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित येण्यास मदत होते. इतकंच नाही तर जांभळाची बी सुकवून त्याची पावडर बनवा आणि त्याचे सेवन करा.
संत्र्यात व्हिटॉमिन सी आणि फायबर्स असतात. त्यामुळे ब्लड ग्लुकोजचे प्रमाण कमी होते आणि इन्सुलिन वाढते.
अननसात कॅलरी आणि ग्लायसेमिक इंडेक्स दोन्ही कमी प्रमाणात असतात. त्यामुळे ग्लुकोज अचानक वाढत नाही.
मधुमेही सफरचंदचे सेवन करु शकतात. यात फायबर्स भरपूर प्रमाणात असल्याने फायदा होता.
पपईत व्हिटॉमिन सी आणि अॅँटीऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे मधुमेहींसाठी ते अतिशय उत्तम ठरते.
नासपतीमध्ये फायबर्स आणि अॅँटीऑक्सीडेंट्स असल्याने ते मधुमेही खाऊ शकतात.
पेरुत ग्लायसेमिक इंडेक्स कमी असून व्हिटॉमिन सी, फायबर्स आणि अॅँटीऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे मधुमेही पेरु खाऊ शकतात.