हिवाळ्यात तुम्ही रात्री मोजे घालून झोपता? मग 'हे' दुष्परिणाम एकदा वाचाच

थंडीपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात अनेकदा बरेच लोक मोजे घालून झोपणं पसंत करतात. परंतु, बरेच आरोग्यतज्ज्ञ हिवाळ्यात रात्री मोजे काढून झोपण्याचा सल्ला देतात. जाणून घ्या, रात्री मोजे काढून झोपण्याचे फायदे.  

Updated: Feb 6, 2025, 04:14 PM IST
हिवाळ्यात तुम्ही रात्री मोजे घालून झोपता? मग 'हे' दुष्परिणाम एकदा वाचाच title=

Sleeping With Socks in Winter: हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी सगळ्यांसाठी ऊबदार कपडे घालणे हे सोयीचे असते. तसेच, कित्येक लोक हिवाळ्यात हीटरचादेखील वापर करतात. अशातच थंडीपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात अनेकदा बरेच लोक मोजे घालून झोपणं पसंत करतात. परंतु, बरेच आरोग्यतज्ज्ञ हिवाळ्यात रात्री मोजे काढून झोपण्याचा सल्ला देतात.  यामागचं कारण कित्येकांना माहित नसेल. मोजे घालून झोपण्याचे काही वैज्ञानिक दुष्परिणाम आहेत. नक्की जाणून घ्या, रात्री मोजे काढून झोपण्याचे फायदे.

फंगल इंफेक्शनपासून बचाव

गरम मोजे घातल्याने किंवा मोजे घातल्यामुळे घाम आल्याने बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ होते. यामुळे पायांना खाज सुटणे, संसर्ग आणि दुर्गंधी अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे रात्री झोपताना पाय उघडे ठेवणे अधिक फायदेशीर ठरते.

पायाच्या त्वचेला आराम मिळतो

दिवसभर शूज आणि मोजे घातल्याने पायांच्या त्वचेला पुरेशी हवा मिळत नाही. यामुळे घाम साचू शकतो, ज्यामुळे बुरशीजन्य संसर्ग आणि दुर्गंधी येऊ शकते. रात्री मोजे काढून झोपल्याने पायांच्या त्वचेला मोकळी हवा मिळते ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.

रक्तप्रवाह सुरळीत राहतो

अधिक काळ मोजे घातल्याने पायांच्या नसांवर दबाव पडू शकतो. या दबावामुळे रक्तप्रवाहाचा वेग मंदावण्याची शक्यता निर्माण होते. मोजे न घालता पाय मोकळ्या हवेत ठेवल्याने रक्त प्रवाह सुरळीत राहतो आणि पायांच्या नसांना आराम मिळतो.

शरीराचे तापमान संतुलित राहते

झोपेत असताना शरीराचे तापमान नियंत्रित होते. रात्री मोजे घातल्याने शरीराची नैसर्गिक थर्मोरेग्युलेशनची प्रक्रियेत बाधा येऊ शकते. पाय उघडे ठेवल्याने शरीरातील अतिरीक्त उष्णता बाहेर पडण्यास मदत होते, ज्यामुळे शरीर थंड होते आणि गाढ झोप लागते.

हे ही वाचा: उपाशी पोटी दही खाणे सगळ्यांसाठी फायदेशीर नसते; जाणून द्या तुमच्यासाठी योग्य की त्रासदायक

 

झोपेच्या गुणवत्तेत सुधार होतो

संशोधनात असे दिसून आले आहे की जेव्हा शरीराचे तापमान सामान्य राहते तेव्हा झोप चांगली लागते आणि लवकर येते. पाय थंड ठेवल्याने मेलाटोनिनची (झोप-प्रेरित करणारे हार्मोन) पातळी वाढते , ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)