Parineeti Chopra: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि "देसी गर्ल" म्हणून ओळखली जाणारी प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या तिच्या कुटुंबाला वेळ देत आहे. तिचा भाऊ सिद्धार्थ चोपड़ा (Siddharth Chopra) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे, या निमित्तानेच अभिनेत्री भारतात आली आहे. सिद्धार्थ आणि अभिनेत्री नीलम उपाध्याय यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.
प्रियांका या आनंदाच्या क्षणांमध्ये सहभागी झाली आहे. चोप्रा कुटुंबात हल्दी आणि मेहंदीच्या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये प्रियंका आणि तिच्या कुटुंबातील सदस्य मोठ्या उत्साहात दिसत आहेत. मात्र, या फंक्शन्समध्ये एक गोष्ट चाहत्यांनी पटली नाही ती म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री आणि सिद्धार्थची चुलत बहीण परिणीति चोप्रा (Parineeti Chopra) या कार्यक्रमांमध्ये कुठेही दिसली नाही.
गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे की परिणीति आणि प्रियंका चोप्रा यांच्या नात्यात काहीसा दुरावा आला आहे. परिणीति चोप्रा सप्टेंबर 2023 मध्ये आम आदमी पार्टीचे खासदार आणि नेता राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्याशी विवाहबंधनात अडकली होती. त्या वेळी प्रियंका चोप्रा तिच्या बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहू शकली नाही. परिणीति यामुळे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. प्रियांका भारतात आल्यानंतरही दोघींमध्ये भेट झाली नाही, त्यामुळे या चर्चा अजूनच वाढल्या. परिणीति सिद्धार्थच्या लग्नाच्या मुख्य सोहळ्यात सहभागी होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परिणीति चोप्रा प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये दिसली नसली, तरी ती लग्नाच्या मुख्य सोहळ्याला हजर राहील की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही. जर ती आली नाही, तर त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना अजूनच उधाण येईल.
हे ही वाचा: लता मंगेशकर यांची पहिली कमाई किती होती माहितीये का? मिळाले होते फक्त 'इतके' रुपये
परिणीति चोप्रा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण सिद्धार्थच्या लग्नाच्या कोणत्याही फंक्शनमध्ये ती हजर नव्हती. परिणीति नक्की का आली नाही, याबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. काही लोक म्हणत आहेत की ती आपल्या वैयक्तिक कामांमुळे व्यस्त आहे, तर काहीजण यामागे दुसरेच कारण असल्याचे सांगत आहेत. यामागील कारण सध्या उघड झालेले नाही. आता या चर्चांवर परिणीति काय उत्तर देते याची वाट सगळेच जण पाहत आहेत.
सिद्धार्थच्या लग्नाची सर्व तयारी जोमाने सुरू असून, चोप्रा कुटुंब मोठ्या उत्साहात हे खास क्षण साजरे करत आहे.