मुंबई : केळं हे एक सुपरफूड आहे. आरोग्यासाठी फायदेशीर असलेले केळं शरीराला ऊर्जा आणि पोषण देते. केळं खाण्याबरोबरच केसांना लावल्याने देखील खूप फायदा होतो. केसांना केळं लावल्याने केसांचे पोषण होऊन केस चमकदार होतात. पाहुया केसांना केळं लावल्याने फायदे...
१. प्रदूषणामुळे केस कोरडे होतात. सातत्याने केसांना येणाऱ्या कोरडेपणामुळे केस कमजोर होतात. पण टेन्शन घेऊ नका. केळ्यातील फॉलिक अॅसिड असते. त्यामुळे केसांची चमक टिकून राहते. केळ्यात थोडे ऑलिव्ह आईल आणि अंडे घाला. हे एकत्रित मिश्रण केसांना लावल्याने केसांची चमक टिकून राहते.
२. केसांना केळं लावल्याने केस मुलायम होतात. केळ्यात मध घालून केसांना लावल्याने केसांना पोषण मिळते व केस मुलायम होतात.
३. केसांच्या इतर समस्या कोंड्यापासूनच सुरु होतात. केळ्यात व्हिटॉमिन्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळे कोंड्याची समस्या दूर होते.
४. केळ्यात अंड्याचा सफेद भाग मिसळून लावल्याने केस लांबसडक आणि मजबूत होतात. केस घनदाट होतात आणि केसांच्या मुळांना पूर्ण पोषण मिळते.
५. तुमचे केस नेहमी गुंतत असतील तर केसांना केळं लावा. थोडी मुलतानी माती, एक लिंबू आणि दोन केळी यांचे एकत्रित मिश्रण करुन केसांना लावल्याने केस चमकदार, सिल्की होतात.