मुंबई : डान्स महाराष्ट्र डान्स हा कार्यक्रम सध्या लोकप्रियतेचे सर्वच रेकॉर्ड तोडत आहे.
या कार्यक्रमात सहभागी झालेले स्पर्धक आणि त्यांचे अफलातून असे सादरीकरण डान्स च्या इतिहासात एक वेगेळेपण दाखवत आहे . डान्स महाराष्ट्र डान्स च्या कार्यक्रमामुळे अनेक उत्तम डान्सर ना मोठा व्यासपीठ मिळाला. त्यात कोणतेही बंधन नसलेला डान्स महाराष्ट्र डान्स हा कार्यक्रम इतर सर्व कार्यक्रमापेक्षा पूर्णतः वेगळा ठरत आहे. बुधवार ते शुक्रवार रात्री ९:३० वाजता झी युवावरील, प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला हा कार्यक्रम अनोख्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा करणार आहे. या कार्यक्रमाचे दोन स्पेशल एपिसोड शूट झाले आहेत.
जगभरात ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारीही घेतली आहे. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे.महिला दिनानिमित्त काही देशांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात येते. तर काही देशांमध्ये ऑफिसेसमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महिलांनी मिळवलेल्या यशाचा, अतुलनिय कामगिरीचा आढावा घेत त्यांचे अभिनंदन आणि कौतुकही या निमित्ताने करण्यात येते. महिलांना प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळवून देण्यासाठी प्रत्येक देशाने काही मार्गदर्शक तत्त्वे, कार्यक्रम निश्चित केले आहेत. डान्स महाराष्ट्र डान्स च्या व्यासपीठावर दोन स्पेशल एपिसोड हे महिला स्पर्धकांना गौरवण्यासाठी शूट केले गेले. या दोन्ही एपिसोड मध्ये केवळ महिला स्पर्धकांनी परफॉर्म केले. त्याच बरोबर अशा मातांचा गौरव करण्यात आला ज्यांनी त्यांच्या मुलींना या स्पर्धेत पाठवेल, प्रोत्सहन दिले.
या दोन स्पेशल एपिसोड मध्ये दिनांक ७ मार्च ला अमेय वाघ डान्स महाराष्ट्र डान्स च्या व्यासपीठावर महिला स्पर्धकांना प्रोत्साहन देताना दिसेल. या एपिसोडमध्ये अमेय वाघ ने महिला दिनाचे महत्व आई वर एक कविता म्हणून प्रेक्षकांना एक अनोखी भेट दिली. दिनांक ८ मार्च ला झी युवावरील मालिकांमधील हृता दुर्गुळे (वैदेही - फुलपाखरू) , कौमुदी वालोकर ( कुहू - देवाशप्पथ ) , पल्लवी पाटील ( निशा - बापमाणूस ) आणि अश्विनी कासार ( पूर्वा - कट्टी बट्टी ) या अभिनेत्रींनी स्पर्धकांबरोबर धमाल केली . त्यांनी या महिला स्पर्धकांना केवळ प्रोत्साहनच नाही दिले तर त्यांनी या सर्वांबरोबर दिलखुलास डान्स सुद्धा केला. ७, ८ आणि ९ मार्च चा डान्स महाराष्ट्र डांन्सचे हे विशेष भाग महिला स्पर्धकांचे उत्कृष्ट डान्स परफॉर्मन्स आणि कलाकारांची विशेष भेट यामुळे आणखी अनोखा ठरणार आहे.