'कोण रणबीर कपूर?' चुलत भावालाच ओळखत नव्हता ब्लॅक वॉरंटचा अभिनेता जहान, म्हणाला 'लाज वाटते, पण जेव्हा तो... '

'ब्लॅक वॉरंट' मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शशी कपूर यांची नात जहान कपूरने म्हटले आहे की, तो रणबीर कपूरला ओळखत नव्हता. रणबीर चित्रपटांमध्ये आल्यावर त्याला त्याची ओळख झाली. जहानच्या मते, या दोघांचं संगोपन वेगळं झालं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 3, 2025, 11:48 AM IST
'कोण रणबीर कपूर?' चुलत भावालाच ओळखत नव्हता ब्लॅक वॉरंटचा अभिनेता जहान, म्हणाला 'लाज वाटते, पण जेव्हा तो... ' title=

रणबीर कपूरचा चुलत भाऊ आणि शशी कपूरचा नातू जहान कपूर सध्या त्याच्या 'ब्लॅक वॉरंट' या वेब सिरीजमुळे चर्चेत आहे, ज्यासाठी त्याचे खूप कौतुक होत आहे. जहानने अलीकडेच एका मुलाखतीत रणबीर आणि करीना कपूर या चुलतभावांबद्दल बोलला आहे. एवढंच नव्हे तर तो रणबीर कपूरला या आधी ओळखत नसल्याचही त्याने सांगितलं आहे. 

'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत जहानने सांगितले की, तो आणि रणबीर कपूर एकत्र वाढले नाहीत. त्यांचे संगोपन वेगवेगळे होते. 'सावरिया' या चित्रपटातून रणबीर पदार्पण करत असताना जहान कपूरला रणबीरबद्दल माहिती मिळाली. जहान हा शशी कपूर यांचा नातू आहे, तर रणबीर आणि करीना हे राज कपूरचे नातवंडे आहेत हे. राज आणि शशी कपूर हे दिवंगत अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे पुत्र होते.

रणबीर आणि करीनासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल बोलताना जहान म्हणाला की, 'आम्ही आधी फार जवळ नव्हतो. आता मी त्यांच्याशी एक नाते निर्माण केले आहे. ते माझे चुलत भाऊ आहेत. आम्हाला वेगळ्या पद्धतीने वाढवलं गेलं. करीना आणि रणबीर एकमेकांच्या खूप जवळचे आहे. आम्ही फार जवळ नव्हतो पण आमच्या बालपणीच्या आठवणी आहेत. कुटुंबही खूप मोठे आहे.'रणबीर चित्रपटात येईपर्यंत मला त्याच्याबद्दल माहिती नव्हती'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zahan (@zahankapoor)

जहानने पुढे सांगितलं की, 'मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो.' मला याची लाज वाटते. रणबीर चित्रपटांमध्ये येईपर्यंत मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. मला चिंटू काकांविषयी माहिती होती, पण आम्ही एकमेकांपासून खूप वेगळे होतो. 2007 मध्ये जेव्हा रणबीरने 'सावरिया' चित्रपटातून पदार्पण केले तेव्हा मी शाळेत होतो.

जहान पुढे म्हणाला की, 'आम्ही वेगळे वाढलो. आमचे संगोपन वेगळे होते. माझे आजोबा शशी कपूर स्वतःला लाईम लाईटपासून दूर ठेवत असत कारण त्यांची गोपनीयता त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची होती. आम्ही एक विभक्त कुटुंब असल्याने, आम्ही गोपनीयतेची देखील काळजी घेतली. संपूर्ण कुटुंब फक्त खास प्रसंगीच एकत्र येत असे.

जहानचे वडील देखील एक अभिनेते होते, आता ते एक जाहिरात कंपनी चालवतात. जहान कपूर हा अभिनेता कुणाल कपूरचा मुलगा आहे. कुणाललाही त्याचे वडील शशी कपूर यांच्यासारखे चित्रपटांमध्ये नाव कमवायचे होते, पण ते यशस्वी झाले नाही. त्यांनी सुमारे 6 चित्रपट केले आणि त्यांच्या अपयशानंतर त्यांनी चित्रपट सोडून दिले आणि एक जाहिरात कंपनी सुरू केली.