Shivraj Rakshe : "तर मी हार मानायला तयार ..." शिवराजची निलंबनानंतर पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Kesari Shivraj Rakshe Controversy with Umpire: नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा पराभव झाल्यानंतर हा पैलवान आक्रमक झाला आणि त्याने थेट पंचांना मारहाण केली  

तेजश्री गायकवाड | Updated: Feb 3, 2025, 12:59 PM IST
Shivraj Rakshe : "तर मी हार मानायला तयार ..." शिवराजची निलंबनानंतर पहिली प्रतिक्रिया  title=

Maharashtra Kesari 2025: अहिल्यानगर इथे रविवारी  झालेल्या महाराष्ट्र केसरी 2025  च्या गादी विभागातील अंतिम लढत नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात रंगली होती. तर माती विभागातील अंतिम लढत सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यामध्ये रंगली. या रोमांचित लढतीत माती विभागातील अंतिम लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने तर गादी विभागातील अंतिम लढतीत पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ याने धडक मारली. सरतेशेवटी पृथ्वीराज मोहोळने हा मनाचा विजय मिळवला.  पण यंदा महाराष्ट्र केसरी 2025 गालबोट लागलं. नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा पराभव झाल्यानंतर हा पैलवान आक्रमक झाला आणि त्याने थेट पंचांना मारहाण केली. यावेळासाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत एवढं तणावाचा वातावरण निर्माण झालं की  पोलिसांना या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला. यानंतर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांनी पंचांशी घातलेल्या हुज्जतीमुळे त्यांना तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. यावर आता शिवराज राक्षेने आता त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

शिवराज राक्षेने कुस्तीतील निर्णय पंचांनी चुकीचा दिला आणि दाद मागायला गेल्यानंतर बरोबर प्रतिसाद दिला नाही असे सांगितले. शिवाय दाद मागायला गेल्यानंतर शिवीगाळ झाल्याचेही त्याने सांगितले. 

हे ही वाचा: पैलवान शिवराज राक्षेच्या निलंबनावर कुटुंबीयांची आली प्रतिक्रिया, म्हणाले " तर पंचांवरही..."

 

शिवराज नक्की काय म्हणाला?

"मी पंचांना माझा निकालाचा व्हीडीओ रिव्ह्यूव बघण्यासाठी यासाठी प्रयत्न करत होतो. पण त्यांनी मला व्हीडीओ दाखवला नाही. फक्त माझं तेवढच एक चॅलेज होतं की रिव्ह्यूव व्हीडीओ आहे कुस्तीचा तो जनतेला दाखवावा. त्यानुसार निर्णय घ्या. जर माझी पाठ टेकली असेल तर मी हार मानायला तयार आहे." 

हे ही वाचा: क्रिकेटरशी लग्न करण्यासाठी 'ही' टीव्ही रिपोर्टर झाली मुस्लिम, प्रेमासाठी तोडली धर्माची भिंत!

 

हे ही वाचा: कॉमेंटेटर क्रिकेटपटूंपेक्षा कमी नाही! कमाई ऐकून व्हाल थक्क, जगतात लॅव्हिश लाइफस्टाईल

 

नक्की काय आहे प्रकरण? 

अहिल्यानगर येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ, आमदार संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्यावतीने  महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या अंतिम लढतीत पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ याने नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा पराभव केला. मात्र शिवराज राक्षे याला हा पराभव मान्य झाला नाही. या पराभवानंतर पैलवान शिवराज राक्षे आक्रमक झाला आणि त्याने चुकीचा निर्णय दिला म्हणून थेट पंचांना मारहाण केली. त्यामुळे काका पवारसह इतर पैलवानांनी पंचांच्या निर्णयावर आक्षेप नोंदावला. खेळाडूंनी मैदानातच वाद घातला.