Gold Price Today: बजेटच्या दिवशी सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली होती. मात्र आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर कोसळले आहेत. जगभरातच आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर गडगडले आहेत. अमेरिकेकडून ग्लोबल ट्रेड वॉक सुरू करण्यात आल्यानंतर डॉलर इंडेक्समध्ये तेजी आली आहे. त्यामुळं मौल्यवान धातु आणि बुलियन्समध्ये दबाव दिसत आहे. डॉलर इंडेक्समध्ये एक टक्क्याने उसळी घेत सोनं 10 डॉलरने कोसळले असून 2825 डॉलरवर स्थिरावली आहे. तर चांदीच्या दरातही घट झाल्याचे पाहायला मिळतेय.
शनिवारी सोन्याच्या दरात 84,900 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या उच्चांक गाठला होता. एक जानेवारी ते आत्तापर्यंत सोन्याच्या दरात 5,510 रुपये म्हणजेच सात टक्क्यांपर्यंत तेजी आली आहे. तर आज सोन्याचे दर कोसळले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 400 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं आज प्रतितोळा सोनं 84,050 रुपयांवर पोहोचले आहे.
आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 400 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं 77,050 रुपयांवर पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 63,040 रुपयांवर पोहोचली आहे. तर एकीकडे चौथ्या दिवशी चांदीच्या दरात तेजी आल्यानंतर आज चांदी 700 रुपयांनी मजबूत होऊन 95,700 रुपयांच्या प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 77,050 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 84,050 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 63,040रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,705 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 8,405 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 6,304 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 61,640 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 67,240 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 50,432 रुपये
मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 77,050 रुपये
24 कॅरेट- 84,050 रुपये
18 कॅरेट- 63,040रुपये