VIDEO : अबरामसोबत शाहरूख मुंबईच्या रस्त्यांवर

अबरामचा व्हिडिओ पुन्हा चाहत्यांच्या पसंतीला 

VIDEO : अबरामसोबत शाहरूख मुंबईच्या रस्त्यांवर  title=

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानचा मुलगा अबरामचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता अबरामचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत अबरामसोबत शाहरूख खान देखील आहे. 

या व्हिडिओत अबराम आणि शाहरूख एका मोकळ्या कारमध्ये आहेत. या कारला अनेक बाईकवाले ओव्हर टेक करताना दिसत आहेत. 

बाईकस्वारांच्या या स्वभावामुळे शाहरूखला गाडी चालवणं अतिशय कठीण होत आहे. या व्हिडिओत अबराम सगळ्यांना हात दिखावून हॅलो करताना दिसत आहे. 

अबरामचे अगदी लहानपणापासून खूप व्हिडिओ व्हायरल झाले. नुकताच त्याचा मीडियावर भडकलेला देखील एक व्हिडिओ आला. पण या व्हिडिओत अबराम शाहरूखसोबत खूप मस्ती करताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#shahrukhkhan with #abramkhan in a open car. @srk__updates

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

अबराम एका व्हिडिओत मीडियावर भरपूर भडकल्याचं दिसत आहे. आराध्याच्या बर्थ डे पार्टीनंतर अबरामचे फोटो घेताना तो मीडियावर भडकला. फोटोग्राफर्सपासून चेहरा लपवणारा अबराम एकदाच भडकला आणि No Pictures असं सांगून रागावला. 

अबरामचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अबरामचं हे रूप सगळ्यांनाच धक्कादायक आहे. या अगोदर अनेकदा त्याचा क्यूट व्हिडिओ शेअर झाल्याचं पाहिलं आहे. 

बी टाऊनमधील जास्त चर्चेत असलेला किड्सपैकी एक शाहरूख खानचा मुलगा अबराम. अबराम 5 वर्षांचा असून 27 मे 2013 मध्ये त्याचा सरोगसीच्या माध्यमातून जन्म झाला. अबराम अगदी सुरूवातीपासूनच लाइमलाइटमध्ये आहे. आर्यन आणि सुहानानंतर शाहरूख खानचा अबराम तिसरा अपत्य आहे.