Vicky Kaushal Nazar Video : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा छावा हा चित्रपट व्हॅलेन्टाइन डे च्या निमित्तानं प्रदर्शित झाला. या चित्रपटानं सगळ्यांना वेड लावलं असून सगळ्यांना या चित्रपटातील विकी कौशलचा अभिनय प्रचंड आवडला आहे. सगळीकडून त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. या सगळ्यात विकीनं सोशल मीडियावर एक भावूक करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत कशा प्रकारे ती महिला विकीची नजर काढता दिसते. त्यानं अनेकांना विकीवर गर्व वाटत आहे तर काही नेटकरी हे भावूक झाले आहेत.
विकी कौशलनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत विकी हा दरवाज्यात उभा असल्याचं दिसत आहे. त्यानंतर ती महिला विकीची नजर काढताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत विकी कौशलनं कॅप्शन दिलं की 'आशा ताईनं मला लहाणाचा मोठं होताना पाहिलंय... म्हणजे उंचीनं सुद्धा आणि आयुष्यात सुद्धा. काल त्यांनी छावा पाहिला आणि त्यांनी हट्ट केला की उभे रहा, नजर उतराएची आहे तुमची… प्रेम दाखवण्याचा आणि इतर गोष्टींपासून माझं संरक्षण व्हाव यासाठी त्यांचा असलेला हा एक मार्ग. त्या माझ्या आयुष्यात आहेत याचा मला खूप आनंद आहे.' तर ही महिला दुसरी कोणी नसून विकीला लहाणपणापासून सांभाळणारी आहे.
विकी कौशलच्या या व्हिडीओवर सेलिब्रिटींपासून नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत त्यांना झालेला आनंद आणि कौतूक केलं आहे. संतोष जुवेकर कमेंट करत म्हणाला, 'याला म्हणतात प्रेम कमावणं... याल म्हणतात... इज्जत बढ गई और नजर उतर गई... आई जगदंब खूप यश देवो राजं.' सुव्रत जोशी म्हणाला, 'इडा पीडा टळो, हे एकत्र आणि सगळ्यांकडून मिळालेलं खरं प्रेम आहे.' रॅपर बादशाह कमेंट करत म्हणाला, 'सर, तुम्ही... तुम्ही केलेल्या कामाला पाहता तुम्हाला हे सगळं मिळायलाच हवं.' अशा अनेक कमेंट विविध सेलिब्रिटी करताना दिसत आहेत.
याशिवाय अनेक नेटकऱ्यांनी देखील या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'तुम्ही पुढील आयुष्यात खूप यशस्वी व्हाल. या महाराष्ट्र रक्षण्याच्या अग्नीकुंडात अनेक नररत्ननानी प्राण ज्योती विजवल्या आहेत... याच गोष्टी तर पुढे आणात गेलात तर.. तुमच्या आसपास कोणी ही पोहचू शकणार नाही... इथली लोक अन माती तुम्हाला अंगा खांद्यावर नाचवल्या बिगार राहणार नाही..' दुसरा नेटकरी म्हणाला, 'इतका चांगला चित्रपट आहे नजर तर काढायलाच हवी.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'रोज दृष्ट काढायला सांगा.'
हेही वाचा : 'आम्ही सामान्य आहोत, तुझ्यासारखं...', रश्मिका मंदाना रणबीर कपूरला स्पष्टच बोलली
चित्रपटाने आतापर्यंत देशभरात सुमारे 219.75 कोटी रुपये कमावले आहेत. या आठवड्याच्या शेवटी हा चित्रपट 250 कोटींचा टप्पा ओलांडेल असा दावा केला जात आहे. जर असे झाले तर चित्रपट 300 कोटींचा टप्पा सहज पार करेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे.