'चित्रपट साईन कर नाहीतर...', जेव्हा शाहरुख खानला अंडरवर्ल्डने दिली होती धमकी, 'तुला जीवे मारु अन्....'

Shah Rukh Khan Death Threat : शाहरुख खानला जेव्हा अंडरवर्ल्डकडून मिळाली होती जिवेमारण्याची धमकी...

दिक्षा पाटील | Updated: Jan 14, 2025, 05:01 PM IST
'चित्रपट साईन कर नाहीतर...', जेव्हा शाहरुख खानला अंडरवर्ल्डने दिली होती धमकी, 'तुला जीवे मारु अन्....' title=
(Photo Credit : Social Media)

Shah Rukh Khan Death Threat : बॉलिवूड चित्रपटसृष्टी ही नेहमीच चर्चेत असते. एक काळ असा देखील होता जेव्हा या चित्रपटसृष्टीत सगळं काही ठीक दिसत असलं तरी नव्हतं. त्यावेळी माफिया आणि अंडरवर्ल्डचं बॉलिवूडवर लक्ष होतं. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. ज्यात शाहरुखनं त्याच्या स्ट्रगलच्या वेळीविषयी सांगितलं आहे. 

शाहरुख खाननं सांगितलं की 'हिंदी चित्रपटसृष्टी सगळ्यात सोपी इंडस्ट्री आहे. आम्हाला चित्रपट करण्यास सांगण्यात आलं होतं. आम्ही जगातील सगळ्यात जास्त चित्रपटांची निर्मिती करणारे आहोत.' शाहरुखनं सांगितलं की 'त्याला एक चित्रपट करण्यासाठी सांगितलं. जेव्हा त्यानं विचारलं की निर्माते कोण आहेत. तर त्याला उत्तर मिळालं, हा तो व्यक्ती आहे ज्याला आम्ही पाठवतोय. तू त्याच्याशी बोलून घे आणि चित्रपट साइन कर.'

शाहरुखनं पुढे सांगितलं, 'जर तुला मरण्याची भीती आहे, तर तू तो चित्रपट साईक कर. जर तुला तुझं नशिब आजमवायचं असेल तर चित्रपटाला नकार देऊन बघ. तर तुम्ही त्याला नकार देतात.' शाहरुखनं चित्रपट करण्यास नकार दिला. अनेक मीडिया रिपोर्ट्सनं हे देखील सांगितलं की किंग खाननं नकार दिल्यानंतर जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. जेव्हा त्याला विचारण्यात आलं की त्याला कधी धमकी देण्यात आली होती? तर त्यांनी सांगितलं की हो अनेकदा असं झालंय. माझ्याकडे तीन वर्ष पोलिसांची सुरक्षा होती.'

हेही वाचा : सलमानच्या कुशीत फिरणारी छोटी राशा; 16 वर्षात इतकी बदलली रवीनाची लेक

1998 मध्ये बॉलिवूडला हिंदी चित्रपटसृष्टीचा दर्जा देण्यात आला होता. आयएएनएसच्या रिपोर्ट्सनुसार, सुषमा स्वराजनं अटल बिहारी वाजपेयीच्या लीडरशिप असलेल्या सरकारमध्ये केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रीच्या रुपात काम केलं होतं. त्यांनी 1998 मध्ये चित्रपट प्रोडक्शनला 'उद्योगचा दर्जा' देण्यात आला. ज्यामुळे चित्रपटसृष्टीला वैध बनवण्यात आलं आणि त्याला वित्तीय संस्थांशी लोन घेणं सोपं झालं होतं. त्यामुळे व्याज घेण्यापासून अनेक गोष्टी संपवण्यात आल्या. ज्यात बिल्डर, ज्वेलर्स, व्यापारी आणि अंडरवर्ल्डसोबत अनेक बिझनेसमन सहभागी होते.