Honey Singh Divorce: सलमान खानचा (Salman Khan) भाऊ सोहेल खान आणि सीमा खान (Seema Sachdev Khan) यांच्या घटस्फोटाच्या (Sohail Khan Divorce) चर्चेनंतर अजून एका प्रसिद्ध गायकाचा घटस्फोट झाला आहे. पंजाबी गायक Yo Yo Honey Singh आणि शालिनी तलवार (Shalini Talwar) यांचा घटस्फोट (Divorce) झाला आहे. हनी सिंग यांना शालिनी यांना एक कोटी रुपयांची पोटगी (Alimony) द्यावी लागली आहे. दिल्लीतील साकेत जिल्हा न्यायालयाच्या कौटुंबिक न्यायालयात हनी सिंगने पोटगीचा एक कोटी रुपयांचा धनादेश सीलबंद कव्हरमध्ये पत्नीला दिला. (Treading News honey singh and shalini talwar divorce and 1 crore alimony)
हनी सिंगची पत्नी शालिनी तलवार हिने गेल्या वर्षी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. शालिनीने तिच्या तक्रारीत पंजाबी गायक (Punjabi singer) आणि रॅपर (rapper) हनी सिंगने अनेक महिलांसोबत संबंध ठेवून आपली फसवणूक केल्याचा आरोप केला होता. त्याची पत्नी शालिनी तलवार हिने रॅपरवर घरगुती हिंसाचार, लैंगिक हिंसा आणि मानसिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. शालिनी तलवार यांनी 'कौटुंबिक हिंसाचार, महिलांचे संरक्षण कायदा' अंतर्गत 10 कोटी रुपयांची भरपाई मागितली होती.
हनी सिंग आणि शालिनी यांचं 2011 मध्ये लग्न झालं होतं. त्यापूर्वी अधिक काळ रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, 2014 मध्ये सर्वांना हनी सिंगच्या लग्नाची माहिती मिळाली. गायकाला त्याचं लग्न त्याच्या कारकिर्दीच्या मार्गावर येऊ द्यायचं नव्हतं, म्हणून त्यांनी लग्न झाल्याचं लपवून ठेवलं होतं. पत्नीने लावलेल्या आरोपांना हनी सिंगने "गंभीरपणे घृणास्पद", "निंदनीय" आणि "स्वभावाने अपमानास्पद" असं म्हटलं आहे.