Amir Khan's Unique Look: आमिर खान हा एक अव्वल अभिनेता आहे. त्याला बॉलिवूडचा परफेक्शनिस्टही म्हटले जाते. तो नेहमीचं चाहत्यांसाठी काही ना काही करत असतो त्यामुळे तो चाहत्यांमध्ये नेहमीचं चर्चेचा विषय बनतो. आता त्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. याचं कारण म्हणजे आमिरचा एक विचित्र व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो एका गुहेतील आदिमानवाच्या वेशात दिसत आहे. एवढेच नाही तर तो लक्ष वेधक हालचाली देखील करत आहे.
रस्त्यावरील लोकं त्याला थांबून पाहत होते. त्याचा हा लूक एवढा अनोखा होता की कोणीच त्याला ओळखू शकले नाही. जेव्हा एका पापाराझीकडून हा आमिर खान असल्याचे कळले तेव्हा यावर कोणाचा विश्वासच बसला नाही. आता हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. कित्येक जण आमिरच्या या हटके लूकचं कौतुक करत आहेत तर अनेक नेटकरी लाईक्सचा वर्षाव करत आहेत. या लूकमध्ये तो फक्त लोकांना पाहत नाही तर तो एक हात गाडी ओढताना दिसत आहे तर कधी दुकानांमध्ये जाताना दिसत आहे. त्याच्या चालण्याची पद्धतदेखील अतिशय विलक्षण आहे.
To Ye Caveman Amir Khan Tha BC
But Why ? pic.twitter.com/fRgDB6cEhr
— POSITIVE FAN (@imashishsrrk) January 29, 2025
आमिर नेहमीच वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करताना हिंट देत असतो. आता नेटकऱ्यांना प्रश्न पडतोय की हा अनोखा लूक करण्यामागे कारण काय? कोणाला वाटत आहे की हे त्याच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटाचा भाग आहे. तर कोणी, ही त्याची नवी जाहिरात असेल असा अंदाज लावत आहे. पण आमिरच्या या व्हिडीओचं सिक्रेट अजूनही उलगडलेलं नाही. आता सगळ्यांचे डोळे आमिरच्या या लूक विषयी काय सांगणार यावर लागले आहेत.
हे ही वाचा: राखी सावंतला प्रेमात पुन्हा धोका! पाकिस्तानचा 'होणारा नवरा' आता म्हणतो- 'मला ही...'
आमिरने हे पहिल्यांदाच केलंय असं नाही. यापूर्वी देखील त्याने असे अनोखे लक्षवेधी लूक केले आहेत. त्यानंतर तो सर्वसामन्यामध्ये फिरताना देखील दिसला होता. त्याची वेशभुषा आणि मेकअप अगदी खरे वाटतात त्यामुळे त्याला ओळखणेही कठीण होते.