आई झाल्यानंतर सोनमला मिळालं जगातील सर्वात Special Gift?, खुद्द सोनमही झाली भावूक

आई झालेल्या सोनम कपूरला एक स्पेशल भेटवस्तू मिळाली आहे. 

Updated: Aug 24, 2022, 09:53 PM IST
आई झाल्यानंतर सोनमला मिळालं जगातील सर्वात Special Gift?, खुद्द सोनमही झाली भावूक

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर ही नुकतीच आई झाली आहे. आपण आई झाल्याची गोड बातमी तिने समाजमाध्यमांवरून दिली. सध्या तिच्या या गुड न्यूजमुळे तिच्या घरी तसेच तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोनमच्या मुलाचे फोटो तिची बहीण रिया कपूर हिने समाजमाध्यांवरून शेअर केले होते ज्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

आई झालेल्या सोनम कपूरला एक स्पेशल भेटवस्तू मिळाली आहे. आपल्याला मिळालेल्या या भेटवस्तूमुळे सोनमही फार हळवी झाली आहे. ही भेटवस्तू तिला खूप आवडली असून ही माझ्या भावनांचे प्रतिनिधित्व करते अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत. 

काय आहे ही खास भेट? 

रितिका मर्चंट यांनी सोनम आणि आनंदला एक खास पेटिंग भेट केलं आहे. या चित्रात गरूड आणि हिरण आहे. या चित्राचे नाव 'नोव्हा' असे आहे. पृथ्वी मातेचे दर्शन या चित्रातून घडते. सोनम आणि तिची बहीण रिया कपूर यांनीही आपापल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर ही पोस्ट शेअर केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या चित्रात निसर्गातून प्रेरणा घेतली आहे तसेच चित्रातून नॉन-सॅच्युरेटेड रंग वापरले आहेत. जलरंग आणि कापलेल्या कागदाच्या घटकांच्या मिश्रणाचा वापर करून चित्रातूमन 17व्या शतकातील बोटॅनिकल प्रिंट्स वापरले आहेत.