'त्यांनी माझ्या स्कर्टमध्ये हात घातला अन्...'; ऋतिक रोशनच्या घरच्या सदस्यावर गायिकेचा गंभीर आरोप

Hrithik Roshan Family Member Sexually Harassment: आपल्याला घरी बोलवण्यात आलं होतं. तेव्हा आपण मुंबईतील सांताक्रुज येथील घरी जाऊन भेट घेतल्याचं या गायिकेनं सांगितलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 15, 2024, 10:52 AM IST
'त्यांनी माझ्या स्कर्टमध्ये हात घातला अन्...'; ऋतिक रोशनच्या घरच्या सदस्यावर गायिकेचा गंभीर आरोप title=
ऋतिकच्या काकांवर गंभीर आरोप (फोटो सोशल मीडियावरुन साभार)

Hrithik Roshan Family Member Sexually Harassment: अभिनेता ऋतिक रोशनचे काका आणि प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक राजेश रोशन यांच्यावर एका गायिकेने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. राजेश रोशन यांनी आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप या गायिकेनं केला आहे. रोशन यांच्या मुंबईतील घरात हा सारा प्रकार घडल्याचा दावा या गायिकेनं केला आहे.

नेमकं घडलं काय?

'स्ट्रेट अप विथ श्री' या पॉडकास्टमध्ये बोलताना प्रसिद्ध बंगाली गायिका लगनजिता चक्रवर्ती यांनी राजेश रोशन यांच्यावर हे गंभीर आरोप केले आहेत. नेमकं काय घडलं याबद्दलची माहिती देताना चक्रवर्ती यांनी, मुंबईतील सांताक्रुझ येथील घरी कामानिमित्त भेट दिली होती त्यावेळेस आपल्याबरोबर छेडछाड करण्यात आल्याचा आरोप केला आहे. "मी त्यावेळी मुंबईत राहत होतो. तेव्हा त्यांनी (राजेश रोशन यांनी) मला कॉल केला होता. त्यांनी मला त्यांच्या सांताक्रुझमधील घरी भेटण्यासाठी बोलावलं. त्यांचं घर फार आलिशान आणि भव्य होतं. ते उत्तम पद्धतीने सजवण्यात आलेलं. आम्ही त्या घरातील म्युझिक रुममध्ये बसलो होतो. त्यामध्ये वेगवेगळ्या सुविधा आणि वेगवेगळी वाद्य होती," असं चक्रवर्ती यांनी पॉडकास्टमध्ये त्या नेमक्या राजेश रोशन यांच्या घरी गेल्या तेव्हा काय घडलं याबद्दलची माहिती देताना म्हटलं आहे.

माझ्याकडे सरकले अन्...

"मी सोफ्यावर बसले आणि ते (राजेश रोशन) माझ्या बाजूला बसले. मी तोपर्यंत अनेक जाहिरातींमध्ये गायलं होतं. समोरच्या टेबलवर आयपॅड होता. त्यांनी मला त्याच्याकडे बोट दाखवत तू केलेली काही कामं दाखव असं म्हटलं. मी आयपॅडवर ब्राऊज करत असतानाच ते माझ्या दिशेने सरकल्याचं मी पाहिलं. मी ते पाहिलं मात्र त्यावर लगेच मी व्यक्त झाले नाही. मात्र त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी त्यांचा हात माझ्या स्कर्टमध्ये घातला अन् आपण विचित्र असं काहीच करत नसल्यासारखं ते सामान्यपणे अगदी काही घडलं नाही असं वागत होते. मी त्यांना फार काही बोलले नाही. मी केवळ तिथून उठले आणि बाहेर निघून आले," असं चक्रवर्ती यांनी म्हटलं आहे.

अनेकांबद्दल असे अनुभव आले पण...

राजेश रोशन यांनी या आरोपांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. मात्र चक्रवर्ती यांनी कास्टिंग काऊच केवळ बॉलिवूड किंवा अभिनय क्षेत्रात होतं असं नाही. मात्र संगीत श्रेत्रातही कास्टींग काऊचचे प्रकार घडतात असा दावा या गायिकेनं केला आहे. आपल्याला केवळ राजेश रोशनच नाही तर इतरांबरोबरची असे वाईट अनुभव आल्याचं चक्रवर्ती यांनी सांगितलं आहे. आपल्याला कोणाचंही थेट नावं घ्यायचं नाही कारण त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण होऊन इतरांचं जगणं कठीण होईल, असं चक्रवर्ती यांनी म्हटलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Satrajit Sen (@satrajits)

लगनजिता चक्रवर्ती या बंगाली चित्रपटांमधील पार्श्वगायिका असून त्यांनी अनेक जाहिरांतींसाठीही छोटी छोटी गाणी गायली आहेत.