Hindu Maharaja Love Story : अभिनेत्री आणि त्यांची लोकप्रियता याविषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. त्यांच्या नेहमीच अफेअरच्या चर्चा रंगलेल्या असतात. आज आपण अशाच एका अभिनेत्रीविषयी जाणून घेणार आहोत. त्या अभिनेत्रीचं नाव आहे जुबैदा बेगम. ज्यांचं लग्न, घटस्फोट आणि मग महाराजांवर प्रेम आणि मग वेदनादायक मृत्यू. 2001 मध्ये 'जुबैदा' नावाचा चित्रपट आला होता. त्या चित्रपटात करिश्मा कपूर मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट जुबैदा यांचा मुलगा खालिद मोहम्मद याने लिहिला होता. जुबैदा बेगम यांच्या मृत्यूच्या रहस्यापासून ते इतर अनेक गोष्टी या चित्रपटात दाखवण्यात आल्या होत्या.
जुबैदा यांची कथा ही फिल्मी होती. ही कथा त्यांच्या घरातून सुरु झाली होती. जेव्हा त्यांच्या वडिलांना कळलं की जुबैदा यांना अभिनेत्री व्हायचं होतं. तर वडिलांनी त्यांना हे न करण्याचा सल्ला दिला. लेकीवर हात उगारला. इतकंच नाही तर लग्न देखील करून दिलं. हेच कारण होतं की जुबैदा बेगम यांनी करियरमध्ये फक्त एकच चित्रपट केला होता. 1952 मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा या चित्रपटाचं नाव 'उषा किरण' आहे. त्यात गीता बाली यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. पण हा चित्रपट कधी प्रदर्शित झालाच नाही.
जुबैदा यांच्या आयुष्यात त्यांच्या वडिलांनी जो निर्णय घेतला आहे. तेच ठरवलं जायचं. 1962 मध्ये आजच्या मुंबईच्या बोहरा शिया मुस्लिम कुटुंबात जुबैदा यांचा जन्म झाला होता. त्यांच्या वडिलांचा फिल्म स्टूडियो होता. तर त्यांची आई लोकप्रिय गायिका होत्या. अशात चित्रपट, गायिका आणि चित्रपटांचं कल्चर जुबैदा यांना त्यांच्या कुटुंबाकडून वारस म्हणून मिळाला. अशात जुबैदा यांना देखील अभिनेत्री होण्याची इच्छा झाली. पण जुबैदा यांच्या वडिलांना ते मान्य नव्हतं की त्यांच्या मुलीनं चित्रपटांमध्ये डान्स वगैरे करावा. ते सेटवर पोहोचले आणि त्यांनी पिस्तुल काढली. इतकं काही झालं की शूटिंगचं थांबली.
त्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर त्यांनी एका मुलाला जन्म दिला. त्याचं नाव खालिद मोहम्मद. मुलाच्या जन्मानंतर त्यांच्या नवऱ्यानं कराचीला जाण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांना फार मोठा धक्का बसला. मात्र, जुबैदा यांच्या वडिलांना हे मान्य नव्हतं आणि त्यांनी त्या दोघांचा घटस्फोट करुन दिला. घटस्फोटानंतर जुबैदा यांना मोठा धक्का बसला. त्यांनी त्यानंतर मुलाकडे त्यांचं सगळं लक्ष दिलं.
जुबैदा बेगम यांच्या आयुष्यात महाराजाची एण्ट्री झाली. 1950 मध्ये त्या राजघराण्यातील एका लग्नात गेल्या. त्यावेळी अनेक गायकांनी त्यांची प्रतिभा दाखवली. अचानक जुबैदा देखील स्टेजवर गेल्या आणि गाऊ लागल्या. सगळ्यांच्या मनात जुबैदा यांनी स्वत:चं एक स्थान निर्माण केलं. त्यावेळी तिथे मारवाड राज्याचे महाराजा हनवंत सिंह देखील उपस्थित होते. जुबैदा यांचा आवाज ऐकताच त्यांना त्यांच्यावर प्रेम झालं. त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर मोठा अडथळा म्हणजे हनवंत सिंह हे जोधपुरचे राजा होता. ते उम्मेद सिंह यांचे सुपुत्र होते. तर जुबैदा या मुस्लिम कुटुंबातून होत्या. त्यात हनवंत यांचं आधीच लग्न झालं होतं. आता त्यांच्या नात्याला सगळे स्वीकार करतील या गोष्टीचा ते विचार करु लागले.
अखेर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. महाराजा यांच्यासाठी जुबैदा यांनी हिंदू धर्म स्वीकारण्यास होकार दिला. 17 डिसेंबर 1950 मध्ये त्या दोघांनी हिंदू परंपरेनं लग्न केलं. त्यानंतर जुबैदा यांचं हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर विद्या रानी हे नाव ठेवण्यात आलं. यावर दोन वेगळ्या गोष्टी म्हटल्या जातात की त्या हिंदू झाल्या पण त्यांनी लग्न केलं नव्हतं. तर दुसरे म्हणतात त्यांनी लग्न केलं होतं. हनवंत हे शाही कुटुंबातून असल्यानं त्यांचं कुटुंब हे जुबैदा यांना सून म्हणून स्वीकारत नव्हते. अशात महाराजा यांना देखील महाल सोडावा लागला. त्यानंतर ते दोघं मेहरानगढ किल्ल्यात राहू लागले. हनवंत यांच्या कुटुंबानं कोणत्याही कौटुंबीक गोष्टीत जुबैदा यांच्या मतांना महत्त्व दिलं नाही किंवा त्यांना तिथे येऊ दिलं नाही. त्यानंतर हनवंत आणि जुबैदा यांना मुलगा झाला आणि त्याचं नाव राजा हुकुम सिंह ठेवण्यात आलं.
दरम्यान, दोन वर्षांनंतर एका प्लेन क्रॅशमध्ये जुबैदा आणि महाराजा यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा हुकुम सिंगचा सांभाळ राजमाता यांनी केली. त्यांचं लग्न झालं त्यांचं कुटुंब देखील होतं. पण 1981 मध्ये हुकुम सिंह यांचं शीर धडापासून वेगळं केलं होतं. दरम्यान, असं का करण्यात आलं याचं सत्य कोणालाही माहित नाही.