मुलीला शाळेतून घेण्यासाठी आलेल्या शिल्पाची अवस्था, मुलीसोबतचा व्हिडीओ व्हायरल

शिल्पाची मुलीसोबतचा व्हिडीओ व्हायरल  

Updated: Jan 25, 2022, 09:53 AM IST
मुलीला शाळेतून घेण्यासाठी आलेल्या शिल्पाची अवस्था, मुलीसोबतचा व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम कोणत्या तरी कारणामुळे चर्चेत असते. आता देखील ती मुलगी समिषामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी शिल्पा मुलीला गायत्री मंत्र शिकवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर समिषाचा आणखी एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये शिल्पा आणि समिषा सुंदर दिसत आहे. शिल्पा प्रसिद्ध अभिनेत्री असल्यामुळे कॅमेऱ्याची तिच्यावर कायम नजर असते.

आता देखील शिल्पाचा मुलीसोबत व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शिल्पा मुलीला शाळेतून घरी परत नेण्यासाठी आली आहे. प्ले स्कूलमध्ये समिषाचा पहिला दिवस असल्यामुळे शिल्पा तिला घेण्यासाठी थेट शाळेत पोहोचली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान, राज्यात आजपासून पहिली ते बारावीपर्यंतच्या मुलांसाठी शाळा सुरू झाल्या असून, कोविडच्या नियमांचे पालन करून आता मुले पुन्हा शाळेत येण्यासाठी उत्सुक आहेत.

अशा परिस्थितीत शिल्पाची मुलगी समिषा एक वर्ष अकरा महिन्यांची झाली असून आता शाळा सुरू झाल्यानंतर ती पहिल्यांदाच तिच्या प्ले स्कूलमध्ये गेली. 

आपल्या बाळाला पहिल्यांदा शाळेत सोडताना पालकांची द्विदा मनस्थिती डोळ्यात आसू चेहऱ्यावर हसू दिसतं. अशी परिस्थिती शिल्पाची देखील झाली.