'ओ सनम'... म्हणणाऱ्या लकी अलीची लेक दिसतेय इतकी सुंदर

हा गायक तरुणाईच्या गळ्यातील ताईत तेव्हाही होता आणि आजही आहे.   

Updated: Oct 16, 2021, 07:45 AM IST
'ओ सनम'... म्हणणाऱ्या लकी अलीची लेक दिसतेय इतकी सुंदर title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : 'ओ सनम'...., 'ना तुम जानो ना हम'.... अशा अनेक गाण्यांना आपला आवाज देत रसिकांना तृप्त करणाऱ्या आणि प्रेमाची भावना अधिक उत्कट करणाऱ्या लकी अली या गायकानं कलाजगतात वेगळं स्थान निर्माण केलं. लकी अली यानं निवडक गाणी गायली, पण त्यानं गायलेलं प्रत्येक गाणं काळजाचा ठाव घेऊन गेलं. असा हा गायक तरुणाईच्या गळ्यातील ताईत तेव्हाही होता आणि आजही आहे. 

संगीत क्षेत्रात वेगळी शैली निर्माण करणारा लकी अली सध्य़ा गोव्यामध्ये आहे. तेथील अनेक व्हिडीओही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता तो आणखी एका कारणामुळं चर्चेत आहे. हे कारण म्हणजे त्याची लेक. लकी अलीची मैत्रीण, अभिनेत्री नफीसा अली सोढी यांनी त्याच्या लेकीचा फोटो त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये शेअर केला आहे. 

सारा इनारा अली असं लकी अलीच्या मुलीचं नाव असून, ही त्याच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी आहे. नफीसा यांनी तिला उल्लेख 'लकी स्टार' असा केला आहे. ही लकी अलीची मुलगी आहे, असं कळल्यानंतर लगेचच सर्वांनी तिच्याबाबत आणखी माहिती जाणून घेण्यासाठी थेट सोशल मीडियाचा आधार घेतल्याचं पाहायला मिळालं. 

लकी अली हा एक असा गायक आहे, ज्यानं सतत आपल्या कामगिरीच्या कामावर या कलाजगतामध्ये स्थान प्रस्थापित केलं आणि कलाजगतापासून दूर असतानाही त्य़ाचा प्रभाव मात्र कायमच राहिला.