बहुप्रतिक्षीत ‘पद्मावती’चा अफलातून ट्रेलर लॉन्च

संजय लीला भन्साली यांच्या आगामी बहुचर्चीत ‘पद्मावती’ सिनेमाचा पहिलावहीला ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. गेल्या अनेक दिवसांपासून या ट्रेलरची वाट पाहिली जात होती. अखेर तो लॉन्च करण्यात आलाय. 

Updated: Oct 9, 2017, 01:45 PM IST
बहुप्रतिक्षीत ‘पद्मावती’चा अफलातून ट्रेलर लॉन्च title=

मुंबई : संजय लीला भन्साली यांच्या आगामी बहुचर्चीत ‘पद्मावती’ सिनेमाचा पहिलावहीला ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. गेल्या अनेक दिवसांपासून या ट्रेलरची वाट पाहिली जात होती. अखेर तो लॉन्च करण्यात आलाय. 

दीपिका पादुकोन, रणवीर सिंह, शाहीद कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘पद्मावती’ सिनेमातील या कलाकारांचे लूक्स रिलीज करण्यात आले होते. त्यानंतर ट्रेलर आज लॉन्च करण्यात आला असून यामुळे सिनेमाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ३ मिनिटांच्या या ट्रेलरमधून सिनेमाचं भव्य रूप काय असेल हे यातून बघायला मिळतं. 

सुरूवातीपासूनच अनेक वादांमध्ये अडकलेला हा ऎतिहासिक कथेवरील सिनेमा येत्या १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर राजस्थानमधील काही संघटनांनी या सिनेमात काही आक्षेपार्ह आढळल्यास सिनेमा प्रदर्शीत होऊ न देण्याचा इशारा दिला आहे.