Govinda-Salman Partner 2: सलमान खान आणि गोविंदा हे खास मित्र आहेत. या जोडीने 2007 मध्ये 'पार्टनर' चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. डेविड धवन दिग्दर्शित हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला होता. तेव्हापासून त्यांना पुढे खूप प्रसिद्धी मिळत गेली. दरम्यान, सध्या चाहते 'पार्टनर'च्या सिक्वेलची वाट पाहत आहेत. 'पार्टनर 2' मध्ये सलमान खान आणि गोविंदा पुन्हा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार का? या प्रश्नाचे उत्तर गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने दिले आहे.
'पार्टनर 2' मध्ये गोविंदा आणि सलमान पुन्हा एकत्र दिसणार?
वास्तविक, पिंकविला हिंदीला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने सलमान खान आणि गोविंदाच्या 'पार्टनर' चित्रपटाच्या सिक्वेलबाबत मोठा खुलासा केला आहे. ज्यामध्ये तिने सांगितले की, 'पार्टनर 2' चित्रपटाबद्दल मी पण खूप ऐकले आहे. पण पुढे काय झाले ते मला माहिती नाही. त्यांनी चित्रपट केला तर बरे होईल. कारण 'पार्टनर' चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रचंड पसंती दिली होती. हा चित्रपट सुपरहिट झाला होता.
वरुण धवनची गोविंदासोबत तुलना, सुनीता आहुजा काय म्हणाली?
दरम्यान, याच मुलाखतीत सुनीता आहुजाने गोविंदा आणि डेविड धवनचा मुलगा वरुण धवन यांच्यातील तुलनेबद्दल सांगितले की, लहानपणापासून पाहत आलेला माणूस, गोविंदाने त्याच्या वडिलांचे 17-18 चित्रपट केले आहेत. त्यामुळे थोडे स्वाभाविकपणे येईल. तो लहानपणापासूनच खेळकर होता. वरुणने त्याचे वडील डेविड धवन यांच्यासोबत अनेक हिट चित्रपटांमध्ये गोविंदाचा अभिनय पाहत मोठा झाला असल्याचं सुनीताने सांगितलं. तो म्हणाला की, 'साहजिकच काही समानता असू शकते'.
अशातच सुनीता पुढे म्हणाली की, काही लोक बोलतात, तुलना करतात पण मला ते काय बोलतात हे समजत नाही. त्यांना देखील ते वाईट वाटत असेल माझी ते सलमान खानसोबत तुलना करतात. वरुणला देखील तुलनेने अस्वस्थ वाटू शकते. कारण जेव्हा त्याची सलमान खान आणि तिच्या पतीशी तुलना केली जाते.
गोविंदा आणि सलमान खान वर्क फ्रंट
सलमान खान लवकरच 'सिकंदर' चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्याने नुकताच 'बेबी जॉन' चित्रपटात कॉमिओ केला आहे. तर गोविंदा हा गेल्या अनेक दिवसांपासून अभिनयापासून दूर आहे.