Ram Gopal Varma ने ओलांडल्या सर्व मर्यादा; अभिनेत्रीचे पाय पकडून Kiss

'स्वतः तुझा दर्जा खालावला आहेस...', अभिनेत्रीचे पाय पकडून Kiss केल्यामुळे राम गोपाल वर्मा वादाच्या भोवऱ्यात... दिग्दर्शक फोटो पोस्ट करत म्हणाला...   

Updated: Dec 8, 2022, 09:32 AM IST
Ram Gopal Varma ने ओलांडल्या सर्व मर्यादा; अभिनेत्रीचे पाय पकडून Kiss  title=

Ram Gopal Varma : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सध्या तेलुगू सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणाऱ्या राम गोपाल वर्माने अभिनेत्रीचे पाय धरत तिला किस (Kiss) करताना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खुद्द राम गोपाल वर्माने फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. कधीकाळी बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक असलेला राम गोपाल वर्माने अभिनेत्रीसोबत केलेल्या वर्तवणुकीमुळे चर्चेत आला आहेत. (dangerous ram gopal varma ott)

राम गोपाल वर्मा यांनी ओलांडल्या मर्यादा

सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिग्दर्शकाने सर्व भूमिका ओलांडल्या असल्याचं कळतं. रामचा सिनेमा 'डेंजरस' (DANGEROUS) लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी दिग्दर्शकाने आवलंबलेल्या मार्गाचा सोशल मीडियावर विरोध होत आहे. (ram gopal varma khatra dangerous)

अभिनेत्रीसोबत राम गोपाल वर्माचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. राम गोपल वर्मा सिनेमाचं चुकीच्या पद्धतीने प्रमोशन करत असल्यामुळे दिग्दर्शकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. रामच्या फोटोवर अनेकांनी कमेंट करत त्याचा विरोध केला आहे. 
(ram gopal varma movies)

रामच्या फोटोवर एक युजर कमेंट करत म्हणाला, 'मला प्रचंड वाईट वाटतं जेव्हा रामला असं पाहतो. कधी तो भारतीय सिनेमांचा प्रसिद्ध दिग्दर्शक होता. सर्व मोठ्या कलाकारांना रामसोबत काम करण्याची इच्छा असायची.' तर अन्य एक युजर कमेंट करत म्हणतो, 'हे काय आहे राम... तु असा नाहीस... तु स्वतः तुझा दर्जा खालावला आहेस. आता चांगल्या कंपनीसोबत काम कर...'

राम गोपाल वर्माचा आगामी सिनेमा 'डेंजरस' एक लेस्बियन क्राईम स्टोरी आहे. या सिनेमात अभिनेत्री अप्सरा नानी आणि नयना गांगुली मुख्य भुमिकेत दिसणार आहे. सिनेमा 9 डिसेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.